लोकसत्ता टीम

नागपूर: शहरातील ‘बदनाम वस्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगाजमुना परिसरात पोलिसांनी मंगळवारी दुपारी छापा घातला. पोलिसांनी अचानक घातलेल्या या छाप्यामुळे वारांगणा आणि ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. वारांगणा आणि ग्राहकांची पळापळ झाली. मात्र, गंगाजमुनाला चारही बाजूनी पोलिसांनी घेराव घातल्यामुळे अनेकांची धरपकड करण्यात आली.

गेल्या अनेक वर्षांपासून गंगाजमुनात देहव्यापार सुरू आहे. गंगाजमुनात जवळपास ३ ते ४ हजार तरुणी व महिला देहव्यापार करतात. गंगाजमुनात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींकडून बळजबरी देहव्यापार करवून घेतल्या जात असल्याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे होती. मात्र, गंगाजमुनातील दलाल लकडगंज पोलीस ठाण्यातील डीबी पथक आणि गुन्हे शाखेच्या युनिटमधील काही कर्मचाऱ्यांशी ‘अर्थपूर्ण’ संबंध ठेवून असतात.

हेही वाचा… गोड द्राक्षासाठी प्रसिद्ध नाशिक आता लाचखोरीतही पहिले; राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार कोणत्या विभागात माहितेय…?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे गंगाजमुनात अल्पवयीन मुलींकडून देहव्यापार सुरू होता. अल्पवयीन मुली पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून दलाल योग्य ती ‘व्यवस्था’ करतात. ही बाब वरिष्ठांच्या लक्षात येताच आज मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा घातला. यावेळी ७ पोलीस वाहनाने जवळपास १०० महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांसह छापा घालण्यात आला. या छाप्यात ६० ते ७० वारांगणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांची सध्या चौकशी सुरु आहे. संपूर्ण गंगाजमुना परिसरातील खोल्यांची झाडाझडती पोलीस घेत आहेत