नागपूर: राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट असून येत्या काही दिवसात राज्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या २३ नोव्हेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर २४ नोव्हेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा… कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा दीक्षाभूमी ते संविधान चौक मार्च… स्थायी करण्याची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२५ नोव्हेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २६ नोव्हेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.