पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबर रोजी नागपुरातील समृद्धी महामार्गासह मेट्रोच्या कस्तूरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक आणि झाशी राणी चौक ते प्रजापती नगर मेट्रो मार्गाचे लोकार्पण करणार आहे. विशेष म्हणजे या पैकी एक मेट्रोचा कामठी मार्गावरील चार-स्तरीय वाहतूक प्रकल्प आहे. हा अशा प्रकारची एकमेव असल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा- दुर्मिळ योग; ८ डिसेंबरला ‘मंगळ’ पृथ्वीच्या जवळ येणार, आणि…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सद्यस्थितीतील वाहतूक आणि पादचारी भुयारी मार्ग हा सर्वात खालचा स्तर आहे. तर त्याच्या वरती असलेला रेल्वे ट्रॅक हा दुसरा स्तर आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि मेट्रो मार्ग अनुक्रमे तिसरा आणि चौथा स्तर आहे. तो एकूण ५.३ किमी असेलल्या आशियातील सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्टचा भाग आहे. गड्डीगोदाम रेल्वे क्रॉसिंगवर जिथून दररोज १५० हून अधिक रेल्वे आणि एक लाखाहून अधिक वाहने जातात त्यावरती लोखंडे पुल उभारला आला आहे.