नागपूर : राज्यात प्रत्येक वर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळतात. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढते. यंदा १ जानेवारी ते ३० जुलैदरम्यान सर्वात कमी म्हणजे केवळ १ हजार ८१३ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात २०१९ मध्ये डेंग्यूचे १४ हजार ८८८ रुग्ण आढळले होते. त्यापैकी ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. ही संख्या २०२० मध्ये ३ हजार ३५६ रुग्ण होती. त्यापैकी १० रुग्णांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये राज्यात १२ हजार ७२१ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. परंतु यंदा १ जानेवारी २०२२ ते ३० जुलै २०२२ दरम्यान १ हजार ८१३ रुग्णांची नोंद झाली, तर एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. माहिती अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना ही माहिती मिळाली.

 २०१३ ते ३० जुलै २०२२ पर्यंत दहा वर्षांत राज्यात या आजाराने तब्बल ५७८ रुग्णांचा बळी घेतल्याचेही माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले. आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाने या माहितीला दुजोरा दिला.  

चार वर्षांतील डेंग्यू स्थिती

वर्ष     रुग्ण   मृत्यू

२०१९      १४,८८८     ४९

२०२०     ३,३५६     १०

२०२१     १२,७२१     ४२

२०२२   १,८१३      ००

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(जुलैपर्यंत)