नागपूर: कुही तालुक्यातील पाचगावमध्ये असलेल्या सिल्वर लेक फार्म रिसॉर्ट हा ‘सेक्स रॅकेट’चा अड्डा बनला असून नागपूर आणि रामटेकमधील दोन दलाल तेथे तरुणींना नृत्य करण्याच्या नावाखाली नेऊन त्यांना आंबटशौकीन ग्राहकांच्या शारीरिक संबंध ठेवतात. गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी तेथे छापा घालून तोकड्या कपड्यात नृत्य करणाऱ्या १३ बारबालांना ताब्यात घेतले होते, हे विशेष.

राजबापू मुथईया दुर्गे यांचे पाचगावामध्ये सिल्वर लेक फार्म रिसॉर्ट आहे. तेथे विपीन अलोने हा व्यवस्थापक म्हणून काम करतो. त्याने ‘सेक्स रॅकेटॅचा संचालक भूपेंद्र ऊर्फ मोंटी अणे (रामटेक) याला हाताशी धरून जवळपास ५० ते ६० तरुणींना देहव्यापारात ओढले आहे. या तरुणींना फार्म हाऊसमध्ये देहव्यापारासाठी आणल्या जाते. मोंटी अणे हा तरुणींना पैशाच्या मोबादल्यात शारीरिक संबंध ठेवण्याचे आमिष दाखवत होता. तसेच या फार्म हाऊसवर अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या रंगारंग पार्ट्या आयोजित करण्यात येतात.

हेही वाचा… एमएचटी-सीईटी परीक्षा: संभाव्‍य वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरू होणार परीक्षा

गेल्या १ ऑक्टोबरला सिल्वर लेक रिसॉर्टवर एका नामांकित किटकनाशक आणि बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीने लाखोंमध्ये व्यवसाय करणाऱ्या कृषी सेवा केंद्र संचालकांना रंगारंग आयोजित केले होती. त्यासाठी मोंटी अणे याने १३ तरुणींची व्यवस्था केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अर्धनग्न असलेल्या बारबाला नृत्य करीत असताना आंबटशौकीन त्यांच्यावर पैसे उधळत होते. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख ओमप्रकाश कोकाटे यांच्या पथकाने रिसॉर्टवर छापा घातला. अश्लील नृत्य करणाऱ्या तरूणींना ताब्यात घेतले तर हॉटेलच्या व्यवस्थापकासह २४ आंबटशौकीनांना अटक केली.

नृत्याच्या नावावर अल्पवयीन मुलींही देहव्यापारात

कंपनीच्या विक्री प्रतिनिधी तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी सिल्वर लेक रिसॉर्टवर नेहमी रंगारंग पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. पार्टीत नृत्य करण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलींनाही पार्टीत आणण्यात येते. तेथील आंबटशौकीन ग्राहकांकडून पैसे घेऊन मुलींना शारीरिक संबंधासाठी बळजबरी करण्यात येते, अशी चर्चा आहे. पोलिसांचा छापा पडल्यानंतरही रिसॉर्टवर रंगारंग पार्ट्यांचे आयोजन होत असल्याची माहिती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माध्यम समूहाचा ऑयकॉन पुरस्कार

ग्रामीण पोलिसांनी लेक फार्म रिसॉर्टवर छापा घातल्यामुळे प्रतिमा मलिन झाली. धार्मिक कार्यक्रमात पुढाकार घेणाऱ्या पाचगावचीसुद्धा बदनामी झाली. मात्र, त्या छाप्याच्या काही दिवसांनंतरच एका माध्यम समूहाने रिसॉर्टच्या संचालकाला आयकॉन पुरस्कार दिला. एका भव्य कार्यक्रमात त्या संचालकाचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.