नागपूर : भारत-पाक सीमा ओलांडून कारगिलमार्गे पाकिस्तानात गेलेली नागपूरची सुनीता जामगडे प्रकरणात एका नवीन कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे. कागरिल पोलिसांनी सुनीताला विशेश अधिनियमअंतर्गंत प्रकरण दाखल केले आहे. या प्रकरणात चौकशीसाठी तिला कारगिलला घेऊन जायचे आहे. परंतु आवश्यक कागदपत्राची पूर्तता पूर्ण होऊ न शकल्याने न्यायालायने सुनीताचा प्रोडक्शन वारंट देण्यास नकार दिला. त्यामुळे कारगिल पोलीस पुढील आठवड्यात प्रोडक्शन वारंट प्राप्त करण्यासाठी न्यायालयात प्रयत्न करतील.

सुनीता जमगाडेचा प्रोडक्शन वारंट घेण्यासाठी कारगिल पोलीस नागपूरच्या न्यायालयात अर्ज केला होता. परंतु आवश्यक न्यायालयिन कागदपत्रे न दिल्याने तूर्तास त्यांना वॉरंट मिळू शकलेला नाही. त्यामुळे कारगिल पोलीस सुनीताला सोबत न देताच परत गेली. कारण, स्थानिक न्यायालयाची परवानगीशिवाय आरोपीला नेता येणे शक्य नाही. आता पुढील आठवड्यात कारगिल पोलीस न्यायालयात वॉरन्टसाठी प्रयत्न करणार आहे. सध्या सुनीता जामगडे न्यायालयिन कोठडीत असून नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत.

काय आहे प्रकरण?

पंजाब न्यायालयात काम आहे. न्यायालयाचे काम आटोपल्यानंतर काश्मीर फिरायला जाणार असे सांगून सुनीता ४ मे रोजी स्वतःच्या १२ वर्षीय मुलासोबत घरून निघाली होती. कारगिल बॉर्डरवरील शेवटचे गाव असलेल्या हुंदरमानमध्ये ती पोहोचली. तिथे गेल्यानंतर मुलाला परत येते असे सांगून एकटीच निघून गेली. तत्पूर्वी मुलाला घरी पाठवत असल्याचे बहिणीला फोन करून सांगितले. स्थानिक लोकांनी मुलाला लद्दाख पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

पोलिसांनी तिचा मोबाईल, आधार, मतदान कार्ड जप्त केले आहे. जप्त मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी सायबर तज्ज्ञाची मदत घेतली जाईल. मोबाईलमधील चॅट आणि डाटा डिलिट झाला असेल तर तो पुन्हा रिकव्हर करून सखोल तपास केला जाईल. मागील काही दिवसांपासून ती पाकिस्तानातील नागरिकांच्या संपर्कात होती, असा संशय आहे.

पाकिस्तानी नागरिकांशी तिने आधी चॅटिंग केले. पोलिसांना त्यांच्या मोबाइलमध्ये काही संशयास्पद अॅप्स सापडले आहेत. परंतु या अँप्स चा नेमका उपयोग काय आहे. याचा तपास सुरू आहे. कारण, चॅटिंग नंतर नियंत्रण रेषा ओलांडून ती पाकिस्तानात गेली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती असताना ती पाकिस्तानात गेली, याकडे पोलिसांनी यांनी लक्ष वेधले. बर्फ दाखवण्यासाठी मुलाला कारगिलमध्ये घेऊन गेली, असे सुनिता ने पोलिसांना सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेरगिरीचा संशय असलेली सुनीता पाकिस्तान पोलिसांच्या ताब्यात ९ दिवस राहिली. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी तिला नंतर भरताच्या ताब्यात दिले. तत्पूर्वी तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून इस्लामाबादला नेले सखोल चौकशी करून अटक केली तिला कारागृहात ठेवले. २३ मे रोजी लिला बीएसएफच्या ताब्यात दिले, अशी माहिती सुनीताने पोलिसांना दिली.