लोकसत्‍ता टीम

अमरावती: एका विधवेला विवाहाचे प्रलोभन दाखवून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. आरोपीने फसवणूक केल्‍याचे लक्षात येताच तिने दुसऱ्या व्यक्तीशी लग्नसंबंध जुळवला, पण आरोपीने तिचे अश्लील व्हिडीओ तिच्या होणाऱ्या पतीसह त्याच्या भावाला देखील पाठविल्‍याची घटना धारणी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली.

साजिद शेख सलिम शेख (३६, रा.धारणी) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याच्‍या विरूद्ध बलात्कार व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पीडितेचे २३ जून २०२२ ते ३१ मे २०२३ दरम्यान लैंगिक शोषण करण्‍यात आले. तक्रारीनुसार, पीडित २६ वर्षीय महिला ही विधवा आहे. गेल्‍यावर्षी तिची आरोपी साजिद शेखशी ओळख झाली. आपण अविवाहित असून तुझ्यावर प्रेम असल्याने तुझ्याशी लग्न करणार आहोत, असे प्रलोभन त्याने विधवेला दाखवले. तिलाही आधाराची गरज असल्याने तिने प्रेमाला होकार दिला.

हेही वाचा… अमरावती : ‘इंडिक टेल्स’विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्‍यांची प्रचंड घोषणाबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याने धारणी येथील एका दुकानात तिचे लैंगिक शोषण केले. तो तिला चिखलदऱ्याच्या हॉटेलमध्ये देखील घेऊन गेला. तेथे देखील त्याने तिचे सर्वस्व लुटले. दरम्यानच्या काळात आरोपी साजिद शेख हा विवाहित असल्याची माहिती पिडितेला मिळाली. आरोपीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच पिडिता स्वत:हून त्याच्यापासून दूर गेली. तिने अन्य व्यक्तीशी लग्न करायचे ठरविले. त्‍याची माहिती होताच आरोपीने पिडितेचे तिच्या नकळत काढलेले अश्लील व्हिडीओ तिच्या होणाऱ्या पतीला व त्याच्या भावाला व्हॉट्सॲपवर पाठविले. त्यामुळे तिला जबर धक्‍का बसला. त्‍यानंतर महिलेने धारणी पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली.