scorecardresearch

भंडारा : बाहेरगावी जातो सांगून निघालेल्याचा मृतदेहच आढळला ! ; गोसे धरणाचे बॅकवॉटर ठरतेय आत्महत्येचे केंद्र

कामासाठी बाहेरगावी जातो असे सांगून तीन दिवसांपूर्वी घरून निघालेल्या तरुणाचा मृतदेह भंडारा तालुक्यातील जाख येथे गोसे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तरंगताना आढळला.

भंडारा : बाहेरगावी जातो सांगून निघालेल्याचा मृतदेहच आढळला ! ; गोसे धरणाचे बॅकवॉटर ठरतेय आत्महत्येचे केंद्र
प्रतिनिधिक छायाचित्र

कामासाठी बाहेरगावी जातो असे सांगून तीन दिवसांपूर्वी घरून निघालेल्या तरुणाचा मृतदेह भंडारा तालुक्यातील जाख येथे गोसे धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तरंगताना आढळला. खिशातील आधारकार्ड वरून मृतदेहाची ओळख पटली.

हेही वाचा >>> नागपूर : दक्षिण पश्चिमच्या कार्यकर्त्यांकडून सहकार्य नाही! ; फडणवीसांसमोरच गडकरींची जाहीर नाराजी

कार्तिक सोमाजी मडावी ( २१, रा. धारगाव ) असे मृत तरुणाचे नाव आहे. वैनगंगा नदीवरील धरणाचे बॅकवॉटर सध्या भंडारा जिल्ह्यातील आणि भंडारा व पवनी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या आजूबाजूच्या गावाजवळ पसरले आहे. मागील दोन महिन्यापासून या बॅकवॉटरमधे हत्या, आत्महत्या होण्याचे प्रकार वाढले आहेत. २३ सप्टेंबर रोजी शैलेश शेळके शेतावर गेले असता एका तरुणाचा मृतदेह दिसला. त्यांनी जाखचे पोलीस पाटील पाटील तसेच अडयाळ पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गावातील तरुणांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह ३ ते ४ दिवसापूर्वीचां असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृताचे मोठे भाऊ नागेश्वर मडावी यांनी मृतदेहाची ओळख पटवली.

हेही वाचा >>> शिंदे-फडणवीस सरकारसाठी ‘वाईन’ झाली आता ‘फाईन’ – वडेट्टीवार

आत्महत्या की हत्या?
या घटनेमुळे अनेक चर्चांना पेव फुटले असून ही हत्या की आत्महत्या या दोन्ही दिशेने पोलीस तपास करीत आहेत. अडयाळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार फुलचंद मेश्राम तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या