राजीव सातव यांच्या निधनाने नागपुरात हळहळ

काँग्रेसचे नेते व राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर नागपूर आणि विदर्भातील सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

नागपूर : काँग्रेसचे नेते व राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर नागपूर आणि विदर्भातील सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

  • तरुण, कर्तृत्ववान व उमदे नेतृत्व गमावले- नाना पटोले

खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक तरुण, निष्ठावान, कर्तृत्ववान, अभ्यासू, प्रचंड क्षमता असलेला उमदा नेता गमावला असून काळाने माझा भाऊ  हिरावून घेतला आहे. अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. काँग्रेस विचारांवार त्यांची प्रचंड श्रद्धा आणि निष्ठा होती. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, गुजरातचे प्रभारी म्हणून पक्षसंघटनेत त्यांनी मोलाचे योगदान दिले. मनमिळावू स्वभाव व कुशल संघटक असणाऱ्या राजीव सातव यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांची मोठी फळी राजकारणात उभी केली.

  • आश्वासक अभ्यासू नेतृत्त्वाला महाराष्ट्र मुकला – देवेंद्र फडणवीस

काँग्रस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दु:खद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कु टुंबीयांना प्राप्त होवो ही प्रार्थना करतो, अशी शोकसंवेदना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त के ली.

  • राजकीय क्षेत्राची हानी – नितीन गडकरी

युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकू न अतिव दुख झाले. सातव यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे के ंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संवेदना व्यक्त के ल्या.

  • देशपातळीवर तळपणारे नेतृत्व निमाले –  डॉ. नितीन राऊत

हिंगोलीसारख्या मागास भागातून काँग्रेस पक्षाचा एक युवा कार्यकर्ता म्हणून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या  काँग्रेसचे सरचिटणीस व खासदार राजीव सातव यांनी अवघ्या काही वर्षांतच देशपातळीवर आपली वेगळी प्रतिमा तयार केली होती. काँग्रेसचे युवा, अभ्यासू  संघटन कौशल्याने परिपूर्ण असलेले  नेतृत्व अकाली हरपले आहे, अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री व अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

  • ओबीसी नेतृत्त्वाचा चेहरा हरपला – सुनील केदार

राजीव सातव यांच्या निधनाने मन खिन्न झाले. सातव यांच्या रूपाने महाराष्ट्र ओबीसी नेतृत्वाचा एक चेहरा काळाने हिरावून नेला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी शोकसंवेदाना पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री सुनील के दार यांनी व्यक्त के ली.

  • राजकारणातील देव माणूस गमावला : विजय वडेट्टीवार

राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला, आम्हा सर्व काँग्रेसजनांना प्रचंड धक्का बसला असून अत्यंत प्रामाणिक, पक्षश्रेष्ठींनी दिलेले काम चोखपणे बजावणारे, पक्षश्रेष्ठीचे अत्यंत जवळचा विश्वासपात्र नेता, चुकलेल्यांवरही न रागावता समजावून सांगणारा मितभाषी असलेला राष्ट्रीय नेता अशी स्वत:ची स्वतंत्र ओळख असलेला राजकारणातील देव माणूस हरपला आहे, अशा शब्दात राज्याचे बहुजन कल्याण,  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त के ल्या.

  • व्यक्तिगत हानी झाली – डॉ. आशीष देशमुख 

सष्टपणा व प्रामाणिकतेचा आवाज म्हणून ओळखले जाणारे सातव यांनी आधार विधेयक, कौशल्य विकास, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग रद्दबातल विधेयक २०१७ आणि इतर घटनात्मक दुरुस्तीसाठी संसदेत काँग्रेसचा आवाज बुलंद केला. पक्षासोबत त्यांची निष्ठा सर्वाना स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची तसेच माझी व्यक्तिगत हानी झाली असून माझा एक प्रामाणिक मित्र काळाने हिरावला, अशी शोकसंवेदना माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The death of rajiv satav caused a stir in nagpur ssh