गोंदिया : मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर राज्यातील ओबीसी समाजातून तीव्र रोष व्यक्त होत आहे. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याचेच पडसाद आता गणेशोत्सवातही उमटू लागले आहे.

गोंदियातील आदर्श कॉलोनी येथील रहिवासी प्राची प्रमोद गुडधे यांनी आपल्या घरी विराजमान झालेल्या गणरायाला ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण कर, असे साकडे घातले. यासाठी त्यांनी साकारलेला आकर्षक देखावा लक्षवेधक ठरत आहे.

हेही वाचा – “मी वित्तमंत्री… ओबीसींचे वसतिगृह, शिष्यवृत्तीसाठी मला भीक द्या”, ओबीसींचे अनोखे आंदोलन

हेही वाचा – अकोल्यात ‘लम्पी’ प्रादुर्भावात सातत्याने वाढ; १० कि. मी. क्षेत्रामध्ये…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, इतर काही निर्माण करण्यापेक्षा ओबीसींच्या मुद्यावर देखावा तयार करण्याची संकल्पना त्यांना सुचली आणि ती त्यांनी साकारसुद्धा केली. सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जातीनिहाय जनगणना, ओबीसींचे वसतिगृह, ओबीसींच्या आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवावी तसेच पोलीस पाटील भरतीत ओबीसी समाजावर झालेला अन्याय, अशा विविध मागण्यांकडे देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी लक्ष वेधले आहे.