नागपूर: करोनानंतर सोन्याचे दर विक्रमी उंचीवर गेले होते. परंतु जम्मू कश्मिर येथील पहेलगाम येथील दहशतवादी हल्यानंतर भारत व पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला. या काळात सोन्याचे दर घसरले. परंतु त्यानंतर पून्हा सोन्याच्या दरात मोठे बदल झाले आहे. ३१ मे २०२५ रोजीच्या तुलनेत ४ जून २०२५ दरम्यान सोन्याच्या दरात मोठे बदल झाले असून त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

करोनाचा उद्रेक सुरू असतांना सोन्याचे दर स्थिर होते. परंतु करोनाचा कठीन काळ संपल्यावर सोन्याचे दर चांगलेच वाढले. बघता- बघता सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहचले होते. दरम्यान जम्मू कश्मिरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर सोन्याचे दर घसरले होते. परंतु आता पून्हा सोन्याचे दरात चांगलेच बदल होतांना दिसत आहे. या सोन्याच्या दरातील बदलाबाबत ग्राहकांमध्ये चिंता वाढत आहे.

नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ मे २०२५ रोजी मेकिंग आणि जीएसटी शुल्क वगळून प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९५ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८८ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७४ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६२ हजार १०० रुपये नोंदवले गेले होते. हे दर चार दिवसानंतर बुधवारी ४ जून २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्राम ९७ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९० हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७६ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ६३ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे चार दिवसात नागपुरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली दिसत आहे. आकडेवारीनुसार नागपुरा ३१ मे रोजीच्या तुलनेत ४ जून २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटमध्ये १ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटमध्ये १ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटमध्ये १ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटमध्ये १ हजार २०० रुपये वाढलेले दिसत आहे.

चांदीच्या दरातही..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरातील सराफा बाजारात मेकिंग व जीएसटी शुल्क वगळता चांदीचे दर प्रति किलो ३१ मे २०२५ रोजी ९७ हजार ७०० रुपये होते. हे दर चार दिवसांनी ४ जून २०२५ रोजी दुपारी १२.५० वाजता प्रति किलो १ लाख २ हजार २०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे ३१ मे २०२५ रोजीच्या तुलनेत ४ जून रोजी चांदीच्या दरात प्रति किलो ४ हजार ५०० रुपये वाढ झालेली दिसत आहे.