लोकसत्ता टीम

नागपूर : उद्धव ठाकरे पहिले चिडवायचे की तुम्हाला दिल्ली दरबारी जाऊन निर्णय करावे लागतात. आज त्यांच्यावर ही परिस्थिती आली असून तीन दिवस दिल्लीत जाऊन वणवण भटकत त्यांना काँग्रेस नेत्यांची मनधरणी करावी लागत आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वैचारिक अध्यायाचा हा चिंताजनक दिल्लीचा हा प्रवास असल्याची टीका राज्याचे वन मंत्री सुधीर मुगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

सुधीर मुगंटीवार नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांना तीन दिवस दिल्लीत राहून काँग्रेस नेत्यांची वाट बघत मुख्यमंत्री पदासाठी याचना करावी लागते यासारखे दुर्देव नाही. इतर दोन मित्रपक्ष हे सांगायला तयार नाही की तेच मुख्यमंत्री असणार. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आता सहानुभूती वाटत आहे. आमच्या सोबत असताना खिशात राजीनामा घेऊन धमकी देत होते मात्र, ही धमकी आता दिली तर आघाडीतील नेते त्यांच्या खिशातले राजीनामे केव्हाही बाहेर काढतील हे सांगता येत नाही. आज त्यांच्यावर दिल्ली दरबारी वन वन भटकरण्याची वेळ आली आहे अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

आणखी वाचा- शहरातील झाडांची माहिती महापालिकाकडून का लपवली जात आहे…

बांगलादेशमधील परिस्थित बोलताना सुधीर मुगंटीवार म्हणाले, रशियात हल्ला झाला तेव्हा हिंदूंसाठी केंद्राने जबाबदारी घेतली होती. मात्र आज हिंदूंचे रक्षण करा म्हणणारे सीएए आणि हिंदूंना आरक्षण देणाऱ्या कायद्याच्या विरोधात जे पक्ष आहे त्यांच्यासोबत ते ( उद्धव ठाकरे) आज जाऊन बसले आहे अशी टीका त्यांनी केली. हिंदू संयमी आणि सहनशील आहे. अनेक आक्रमक झाले तरी हिंदू धर्म टिकला. भारतात बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होईल असा खोटा नेरेटिव्ही विरोधकंकडून केला जात आहे. त्यांनी इतर धर्मीय राष्ट्र आणि भारतात फरक समजुन घेतला पाहिजे असेही मुनगंटीवार म्हणाले.

प्रकाश आंबेडकर आरक्षणाबाबत वक्तव्य करत असले तरी देशात प्रत्येक नेत्याला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. ओबीसीना आरक्षण दिले तर ते देताना इतरांचे नुकसान होऊ नये या तत्त्वावर जर आरक्षण दिले तर जाती जाती दुरावा निर्माण होणार नाही असेही मुनगंटीवार म्हणाले.

आणखी वाचा-कारण राजकारण: अनिल देशमुखांविरोधात उमेदवारीबाबत महायुतीपुढे पेच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयंत पाटील आरोप करत असले तरी त्यांचे आरोप हे कल्पोकल्पित आहे. तसे आरोप करण्यासाठी कायद्यात बंधन नाही. ते माझे चांगले मित्र आहे. पण इतरांसोबत त्यांची स्पर्धा आहे त्यामुळे ते असे खोटे वक्तव्य करत असतात. जरांगे पाटील यांनी काय वक्तव्य करायचे त्यावर कोणी बंधन टाकले नाही त्यामुळे त्याचा ते उपयोग करतात. मात्र आता त्यांच्या वक्तव्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो.