चंद्रपूर: गुरे चराईसाइी जंगल परिसरात गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या व्याहाड ( खुर्द ) उपवन परिक्षेत्रातील उपरी वनबिटातील डोनाळा जंगल परिसरात घडली. आनंदराव वासेकर (५०) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.

आनंदराव वासेकर, चिंदूजी नैताम व किशोर सोनटक्के हे तिघे जण आपली गुरे घेऊन जंगलात गेले होते. गुरे चरत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक आनंदराव वासेकर यांच्यावर हल्ला करून त्याला जंगलात ओढत नेले. सोबतीला असलेल्या दोन व्यक्तींनी ही घटना पाहून आरडाओरडा करीत गावाकडे धाव घेतली आणि गावात या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती गावात मिळताच गावकऱ्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. ही माहिती वनविभागाला व सावली पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने शोधमोहीम राबविली असता, मृत आनंदराव वासेकर याचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत आढळून आला.

हेही वाचा – शेतकरी आहात?… पीकविमा काढायचा विचार करताय?…मग ‘हे’ वाचाच…

हेही वाचा – ५९ दिवसांचे आंदोलन, सरकार नरमले, १०० टक्के अधिछात्रवृत्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी सूर्यवंशी, बीट वनरक्षक सोनेकर, वनरक्षक महादेव मुंडे, आखाडे , मेश्राम व वन कर्मचारी उपस्थित होते. या घटनेमुळे नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.