नागपूर : इंडिगोच्या नागपूर ते बंगळुरू विमानाचे आपत्कालीन प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. त्या प्रवाशाला बंगळुरू येथे ‘सीआयएसएफ’ने अटक केली आहे. आरोपी प्रवाशांचे नाव स्वप्निल होले आहे. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार ३० सप्टेंबरला रात्री सव्वादहा वाजता इंडिगोच्या विमानात स्वप्निल होता. तो आसन क्रमांक ५-इ वर बसला होता.
नागपूर विमानतळावरून विमान उडताच स्वप्निल होले यांनी आपत्कालीन प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे विमानातील प्रवासी घाबरले. विमानातील कर्मचाऱ्याने स्वप्निलला प्रवेशद्वार उघडण्यापासून अडवले. विमान रात्री ११.५५ वाजता बंगळुरू येथे उतरताच स्वप्निलला अटक करण्यात आली. हे विमान बंगळुरू येथून बँकाकला निघाले होते, असे सांगण्यात येत आहे.