यवतमाळ : जालना येथे मराठा समाजाच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ उमरखेड येथे आज सोमवारी सकल मराठा समाजाने बंद पुकारला. या बंदला शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उमरखेड तालुक्यातील व्यापारी प्रतिष्ठान, शाळा, महाविद्यालये आज बंद आहेत. वाहतूक व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. रस्त्यारून तुरळक वाहतूक सुरु आहे. पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला असून सर्वत्र शांतता आहे.दरम्यान उद्या मंगळवारी ५ सप्टेंबरला यवतमाळ येथे सकाळी १० वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात आज शिवतीर्थावर बैठक झाली. त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 4th Sep 2023 रोजी प्रकाशित
जालना लाठीमार घटनेच्या निषेधार्थ उमरखेड बंद; उद्या यवतमाळमध्ये चक्काजाम
उमरखेड तालुक्यातील व्यापारी प्रतिष्ठान, शाळा, महाविद्यालये आज बंद आहेत. वाहतूक व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 04-09-2023 at 12:41 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umarkhed bandh as protest against police lathi charge incident in jalna nrp 78 zws