नागपूर : विदर्भात यावर्षीच्या हंगामात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा ३५२ टक्के अधिक पावसाची नोंद विदर्भात करण्यात आली आहे. यात सर्वाधिक विक्रमी १४४.१ मिलिमीटर पाऊस यवतमाळमध्ये तर त्यानंतर १३३.८ मिलिमीटर पाऊस नागपूरमध्ये नोंदवण्यात आला आहे.

राज्यात उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात होते. या कालावधीत ४७-४८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झालेली विदर्भाने पाहिली आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तिनही महिन्यात कमाल तापमानाचा पारा चढलेला असतो. मात्र, यावर्षी सूर्यनारायण अवघ्या काही काळासाठी आणि अधूनमधून अवतरला. त्यातही तापमान मात्र ४५ अंश सेल्सिअसदरम्यान केले. दरम्यान, अवकाळी पावसाने सूर्यनारायणावर मात केली आणि जेव्हा तापमान वाढले, तेव्हा अवकाळी पाऊस अवतरला. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतील पावसाची आकडेवारी पाहिल्यास विदर्भात एकूण ७३.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जेव्हा की याच कालावधीत साधारणपणे १६.३ मिमी पाऊस पडतो. म्हणजेच या महिन्यांत सरासरीपेक्षा ३५२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद यवतमाळमध्ये १४४.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरीपेक्षा ७३३ टक्के जास्त आहे.

monsoon has been satisfactory across the country in 2024 Maharashtra also received 26 percent more rain than average
देशभरात यंदाचा पावसाळा ठरला समाधानकारक… महाराष्ट्रातही भरपूर पाऊस… एल निनो, ला निना निष्क्रिय?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
imd predict after above average rainfall severe cold weather in maharashtra
जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका
rain Maharashtra, monsoon Maharashtra,
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात किती पाऊस पडला ? जाणून घ्या, सर्वात कमी, सर्वात जास्त पाऊस कुठे झाला
cyclonic air condition developed over North Maharashtra forming low pressure belt to North Bangladesh
पुण्यात बुधवारी पडलेल्या पावसाने २१ सप्टेंबर १९३८ रोजीचा विक्रम मोडला; जाणून घ्या, सप्टेंबर महिन्यांतील आजवरच्या पावसाची आकडेवारी
cyclonic condition in Chhattisgarh will bring heavy rainfall to North Madhya Maharashtra for two days
राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस जाणून घ्या, परतीचा पाऊस कधी सुरू होतो
Cherrapunji temperature, Cherrapunji records highest temperature,
चेरापुंजीमध्ये इतिहासातील उच्चांकी तापमान; जाणून घ्या, तापमान वाढ का झाली
Heavy rain Maharashtra, rain Maharashtra news,
आजपासून चार दिवस मूसळधार पावसाचे

हेही वाचा : बुलढाण्यावर पाणी टंचाईचे सावट! येळगाव धरणात १५ टक्के जलसाठा

नागपूर जिल्ह्यात ४३५ टक्के अधिक १३३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये अकोल्यात २८.१ मिलिमीटर, अमरावतीमध्ये ५७.५ मिलिमीटर, भंडारा ९०.३ मिलिमीटर, बुलढाणा २९.७ मिलीमीटर, चंद्रपूर ८३.२ मिलिमीटर, गडचिरोली २९.८ मिलिमीटर, गोंदिया ८७.५ मिलिमीटर, वर्धा ४५ मिलिमीटर, वाशीममध्ये ५२.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाच्या दिवसांची संख्या जास्त आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत आणखी अवकाळी पावसाची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यासाठी हवामान खात्याने काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे.

हेही वाचा : यवतमाळ: अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न; घरकुलाच्या निधीसाठी तरुणाने उचलले पाऊल

हवामान बदलाचा फटका

बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कापूस, सोयाबीन, संत्रा ही या भागातील प्रमुख पिके आहेत. हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस आणि त्याचा वाईट परिणाम झाला आहे. याशिवाय इतर पिकेही अवकाळी पावसाने वाहून गेली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हवामान अभ्यासकांच्या मते अवकाळी पावसामागे हवामान बदल हेच मोठे कारण आहे. त्यामुळेच यंदा ३५२ मिलिमीटर पाऊस झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.