नागपूर: उन्हाळ्याचे चार महिने उकाडा सहन केल्यावर प्रत्येक जण पावसाची वाट बघतो. परंतु पावसाला सुरवात झाल्यावर सुरवातीला वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. नागपुरातही गुरूवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसात नागरिकांना हा अनुभव आला. वीज खंडित होण्याचे कारणे वेगवेगळी आहेत

नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागात पावसाला सुरवात झाली. नागपुरातही चांगला पाऊस पडत आहे. परंतु शहरातील नंदनवन काॅलनी, नरेंद्र नगर, चिंचभवनसह अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सुरू झाला. महावितरणकडून तातडीने दुरूस्ती केल्याचे सांगण्यात आले. पावसाच्या सुरवातीला हा वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे विविध कारण आहे.

हेही वाचा >>>नागपूर: पावसाळ्याच्या सुरवातीला वारंवार वीज खंडित होण्याची कारणे काय?

पावसाळ्याच्या सुरुवातीला येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे किंवा जोरदार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होते. . असेच प्रकार इतर ऋतूंमध्ये कमी असतात. वीजपुरवठा खंडित होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हवेमुळे परस्परांवर आदळणा-या तारा किंवा कालांतराने निकामी झालेली विद्युत उपकरणे. अनेकदा रोहित्रावर दाब वाढल्यामुळेही प्रवाह खंडित होतो. तारांवर झाडे किंवा फांद्या तुटून पडल्यानेही वीज खंडित होते.

हेही वाचा >>>अकोला : पत्नीने शेतीवर कामासाठी जाण्यास दिला नकार, पतीने संतापून…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वीज पुरवठा खंडित झाल्यावर तो नेमका कुठे झाला असावा याचा अंदाज लाईनवर नेहमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येतो. लूज काँटॅक्ट, स्पार्किंग, झाड किंवा फांदी तारांना घासते का, पशु किंवा पक्ष्यांचा विद्युत तारांना स्पर्श होऊ शकतो, कोणत्या पोलवर उपकरणे निकामी झाली आहेत, कमकुवत झाली आहेत, याची माहिती त्यांना असते.अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे वीज पुरवठा लवकर सुरळीत होण्यास मदत होते.