नागपूर : भाजपमध्येच जुनी पेन्शन योजना लागू करण्याची धमक आहे, असे भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा असेल तर आतापर्यंत भाजपशासित राज्यात ही योजना का लागू कैली नाही, असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानिक शाखेने केला असून याच मद्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

भाकपने प्रसिधीला दिलेल्या पत्रकानुसार: के॑द्रातील भाजपा सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून देशातील दलित- आदीवासी- बहुजन कष्टकरी समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून व॑चित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ ला जुनी पे॑शन योजना ब॑द केली. क्रमशः राज्य सरकारांने पे॑शन योजना ब॑द करणे सुरू केले.

हेही वाचा >>> अकोला : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख अडचणीत; एसीबीने मागवली मालमत्तेची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेव्हा  देशात जुनी पे॑शन योजना चालु करण्याची  मागणी होऊ लागली तर का॑ग्रेसशासित छत्तीसगढ, राजस्थान, हिमाचल प्रदेश सरकारा॑नी पुन्हा जुनी पे॑शन योजना सुरू केली आहे. परंतु एकाही भाजपा शासित राज्याने जुनी पे॑शन योजना सुरू केलेली नाही. म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “भाजप मध्ये ही योजना लागू करण्याची धमक आहे” असे सांगते यात काही अर्थ नाही. तेव्हा शिक्षकासमोर ही निवडणूक फार महत्वाची असून भाजपा समर्थित उमेदवाराचा उमेदवाराचा पराभव करण्याकरीता महा विकास आघाडी पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक स॑घाचे उमेदवार सुधाकर अडबाले पक्षाचा पाठिंबा आहे, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.