नागपूर : ‘तुझे वस्तीतील एका युवकाशी अनैतिक संबंध आहेत’ असा वारंवार आरोप करीत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने मुलाच्या मदतीने खून केला. ही घटना कळमन्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीअंती पत्नी-मुलावर गुन्हा दाखल केला. प्रताप कुळमेथे (४०), रा. बजरंगनगर, कळमना असे मृताचे नाव आहे. चंद्रा कुळमेथे (३०) असे आरोपी पत्नीचे नाव आहे.

प्रतापला दारू व्यसन होते. प्रताप हा पत्नी चंद्रा आणि दोन मुलांसह राहत होता. पत्नी चंद्रा एकदा वस्तीतील युवकाशी बोलताना दिसली. तेव्हापासून तो वारंवार चंद्राच्या चारित्र्यावर संशय घेत होता. ७ मार्चला कामावरून तो घरी गेला. त्याने पत्नीला शारीरिक संबंधाची मागणी केली असता तिने नकार दिला. त्यावरून प्रतापने तिचे अनैतिक संबंध असल्याचा विषय काढला आणि वाद घातला.

हेही वाचा >>> खासगी बसमध्येही तिकीट दरात महिलांना पन्नास टक्के सूट!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रतापने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने चंद्रावर हल्ला केला. मात्र, चंद्राने स्वत:चा बचाव करीत चाकू पकडला. त्यामुळे तिचे हात रक्तबंबाळ झाले. ती ओरडल्याने बाजूच्या खोलीत आराम करीत असलेला अल्पवयीन मुलगा धावून आला. स्वत:चा बचाव करण्याच्या प्रयत्नात माय-लेकांनी त्याच्यावर त्याच चाकूने हल्ला केला. रक्तबंबाळ स्थितीत असलेल्या पतीला मेयो रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.