लोकसत्ता टीम

चंद्रपूर: या शहरात शून्य सावलीचा अनुभव पोलिस फुटबॉल मैदानावर घेण्यात आला. दुपारी १२ वाजून ९ मिनिटांनी अचानक सर्वांच्या सावल्या गायब झाल्याचे चित्र येथे बघायला मिळाले. सावली अदृश्य होताच त्याची नोंद घेण्यात आली.

स्काय वॉच गृप ,चंद्रपुर तर्फे शनिवार २० मे रोजी येथील पोलीस फुटबॉल मैदानावर शुन्य सावली दिवसाचे आयोजन करण्यात आले. दुपारी ठीक १२.०९ वाजता सूर्य अगदी डोक्यावर आला आणि सर्वाच्या सावल्या गायब झाल्या. टेबलावरील सर्व वस्तूंच्या सावल्या अचानक अदृश्य झाल्या. राज्यात ३ ते ३१ मे रोजी शुन्य सावली दिवस येतात. तर चंद्रपुर जिल्ह्यात १८ ते २३ मे या तारखे पर्यंत असतात. चंद्रपुर शहरात मात्र १९ आणि २९ मे रोजी हा दिवस येतो.

हेही वाचा… नागपुरात एकही उष्माघातग्रस्त नाही, तरीही तीन संशयितांचा मृत्यू; महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्याचे ऊत्तरायन होताना सूर्य एका अंशावर २ दिवस असतो. तर दक्षीनायन होताना जुलै मध्ये आपल्याकडे पुन्हा शुन्य सावली दिवस येतो. परंतु पावसाळ्यात तो अनुभवता येत नाही. भौगोलिक दृष्ट्या अभ्यासाच्या दृष्टीने विध्यार्थ्यांना हा दिवस महत्वाचा असतो. ह्याचे महत्त्व असल्याने दरवर्षी स्काय वॉच ग्रुप तर्फे हा उपक्रम राबविण्यात येतो. या खगोलीय,भूगोल उपक्रमास प्रा. सुरेश चोपणे, प्रा योगेश दूधपचारे, महेंद्र राळे, अलका ठाकरे, श्रध्दा अडगुरवार, वन विभागाचे अधिकारी प्रशांत खाडे, नन्दकिशोर खाडे, हैदर शेख आणि विद्यार्थी कु क्षिरजा खाडे, श्रीयांश खाडे,अन्वेशा रामगावकर,जुही काळे,जास्मिन काळे, अनुराग येळे आणि अनंन्या येळे शुन्य सावली शिबीरास उपस्थित होते.