नाशिक : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह अनेक नगरपालिकांचे मुख्याधिकारी अनुपस्थित राहिले. महत्वाच्या बैठकीत अनुपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

एक ते दीड महिन्यांपासून रखडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला अखेर गुरुवारचा मुहूर्त लाभला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत विविध प्रकल्पातील जलसाठ्याचे नियोजन करण्यात आले. बैठकीस जिल्हाधिकारी यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल अनुपस्थित होत्या. तसेच पाणी वहन मार्गावरील नगरपालिका, नगरपरिषदांमधील काही मुख्याधिकारी बैठकीला गैरहजर राहिल्याचे समोर आले. याबद्दल विखे यांनी नाराजी प्रगट केली. नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही वाढत आहे.

हेही वाचा…प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मुंबईकडे रवाना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाण्याबाबतच्या बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहाणे आवश्यक होते. मात्र ते उपस्थित राहिले नाही हे दुर्देव असल्याचे विखे यांनी नमूद केले. महत्वाच्या बैठकीबाबत अनास्था दर्शविणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजवावी, असे निर्देश विखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.