नाशिक : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत सुरक्षा रक्षकाला चाकुचा धाक दाखवत चारचाकी वाहन चोरुन एटीएम फोडणाऱ्या गुन्हेगारास ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि सिन्नर औद्योगिक वसाहत पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली.

मुसळगाव औद्योगिक वसाहतीत औषध पावडर तयार करणाऱ्या कंपनीच्या सुरक्षारक्षकाला चार संशयितांनी चाकु आणि कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करुन कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरा व अन्य सामान उचलण्यासाठी दोरीस बांधले. त्याच दिवशी चोरट्यांनी मुसळगाव परिसरातील सारस्तवत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एटीएममध्ये प्रवेश करून सुरक्षा रक्षकाला चोरीचा धाक दाखवत यंत्रातून १४ लाख रुपये लंपास केले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि औद्योगिक वसाहत परिसर सिन्नर पोलिसांकडून करण्यात येत होता. संशयितांची गुन्हा करण्याची पध्दत, साक्षीदारांनी केलेले वर्णन आणि त्यांची बोलीभाषा यावरून स्थानिक गुन्हे शाखेने माहिती काढत सराईत गुन्हेगार प्रवीण उर्फ भैया कांदळकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हा गुन्हा केल्याचे समजले.

हेही वाचा…सासऱ्यासाठी जावईच काळ, नंदुरबार जिल्ह्यातील बस वाहकाच्या हत्येची उकल

पोलिसांनी गोरख सोनवणे (२८, रा. सिन्नर), सुदर्शन ढोकणे (२८, रा. कुसवाडी) यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी प्रवीण आणि एका विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने मागील आठवड्यात कंपनीतून चारचाकी आणि एटीएम यंत्र चोरण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली.

हेही वाचा…अंतर्गत वादांमुळे महायुतीच्या प्रतिमेस धक्का; उमेदवारीविषयी जाहीर वक्तव्य न करण्याचा राष्ट्रवादीचा सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेला कोयता, भ्रमणध्वनी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांना सिन्नर औद्योगिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून मुख्य संशयित प्रवीणचा शोध घेतला जात आहे.