scorecardresearch

Premium

धुळ्यात वाढीव बांधकामास मंजुरीसाठी लाच घेताना अभियंता जाळ्यात

वाढीव बांधकामास मंजुरी मिळवून देण्यासाठी २५ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका खासगी बांधकाम सल्लागार अभियंत्याला रंगेहात पकडले.

dhule engineer nabbed by anti corruption bureau while accepting bribe
धुळ्यात वाढीव बांधकामास मंजुरीसाठी लाच घेताना अभियंता जाळ्यात (संग्रहित छायाचित्र)

धुळे : येथील औद्योगिक वसाहतीत वाढीव बांधकामास मंजुरी मिळवून देण्यासाठी २५ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका खासगी बांधकाम सल्लागार अभियंत्याला रंगेहात पकडले. धुळे तालुक्यातील अवधान औद्योगिक वसाहतीत एका व्यक्तीला वाढीव बांधकाम करावयाचे होते. यासाठी त्याने औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे प्रकरण दिले होते. परंतु, कार्यवाही होत नव्हती. अहमद अन्सारी (३२, रा.इस्लामपुरा, धुळे) या खासगी बांधकाम सल्लागार तथा अभियंत्याने संबंधित अधिकाऱ्यांवर आपला प्रभाव टाकून हे प्रलंबित काम मार्गी लावून देण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तक्रारीच्या आधारावर प्राथमिक खात्री करुन विभागाने सापळा रचला.

हेही वाचा : गिरीश महाजन यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर; धुळ्यात डॉक्टराविरुध्द गुन्हा, वाहनाची तोडफोड

Open Market Sale Scheme
खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत ई-लिलावात बोली लावणाऱ्या २२५५ जणांना केंद्राने केली गहू अन् तांदळाची विक्री
nitin gadkari
देशात २०७० सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्यासाठी बांधकाम क्षेत्रात हरित उपक्रम राबवले जाणार – नितीन गडकरी
Thane-municipality
ठाण्यातील बेकायदा बांधकामांवर लवकरच हातोडा, पालिकेकडून कारवाईचे नियोजन
Asha workers protest in Panvel
पनवेल : सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळण्यासाठी आशा वर्करची निदर्शने

२५ हजाराची लाच स्वीकारताना अहमद अन्सारी यास रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह त्यांच्या पथकातील निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, शरद कटके,संतोष पावरा,मकरंद पाटील, प्रशांत बागूल,सुधीर मोरे यांनी केली. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dhule engineer nabbed by anti corruption bureau while accepting bribe for approval of extra construction css

First published on: 07-09-2023 at 15:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×