धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोटार सायकल चोरांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून दोन लाख ४० हजार रुपये किंमतीच्या पाच मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून पथकाने ही कारवाई केली. चोरी झालेल्या मोटारसायकल संदर्भात मध्यप्रदेशातील जुलवानिया (ता.बडवाणी) येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. मध्यप्रदेशमधून धुळ्याकडे येणाऱ्या दोन संशयास्पद व्यक्तींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी हटकले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलींसंदर्भात कुठलीही कागदपत्रे त्यांच्याकडे आढळली नाहीत. चौकशीत त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील
मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या.

हेही वाचा – नाशिक : प्रतिबंधित निकोटीनयुक्त ८८ हजारांचे इ सिगारेटचे खोके जप्त

हेही वाचा – पिंपळनेरला चार चोरटे ताब्यात; दोन अल्पवयीनांचा समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व मोटारसायकलींची किंमत दोन लाख चाळीस हजार रुपये आहे. जिब्राईल हुसैन अहीर ( २०, संजय नगर, हुसैनी चौक, जकीरा मशिद जवळ, खरगोन जि. वडवाणी), तालिब महेबुब पटेल (२३ रा. संजय नगर, राजेंद्र नगर पाण्याच्या टाकी जवळ, खरगोन जि. बडवाणी,मध्यप्रदेश) ही संशयितांची नावे आहेत. मोटर सायकल जुलवानिया येथून चोरी करून धुळे येथे त्यांच्या नातेवाईकांकडे ठेवण्यासाठी घेवून जात असल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिली. यापूर्वी संशयितांनी मध्यप्रदेश व महाराष्ट्रतील जळगाव जिल्हयातून तीन मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली. त्या नादुरुस्त असून, धुळे येथील संशयितांच्या नातेवाईकांकडे ठेवल्या असल्याचे सांगितले. या तीनही मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.