नाशिक जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरु झाला की उत्पादकांच्या फसवणुकीचे प्रकार नित्य घडत असतात. निफाड तालुक्यातील एका द्राक्ष उत्पादकाला एक कोटीहून अधिक रकमेला फसविण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी सात जणांविरुध्द निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक मेळाव्यात आमदार चिमणराव पाटील यांची शरद पवारांवर स्तुतिसुमने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक अजित पाटील (४७) यांच्याशी राजेश देवराज याच्यासह अन्य सहा संशयितांनी संपर्क केला. त्यांच्या शेतातील द्राक्षांची निर्यात होऊ शकेल, असे दर्शवित त्यांचा विश्वास संपादन केला. द्राक्षमालाला विदेशात जास्त किंमत देतो. त्यावरील आठ टक्के दलाली घेऊ, उर्वरीत रक्कम तुमच्या खात्यावर जमा करतो, असे आश्वासन देत निर्यातीचे खोटे कागदपत्र तयार केले. काही रबरी शिक्के तयार केले. पाटील यांच्या शेतातील द्राक्ष परदेशात विकून एक कोटीहून अधिक रुपये आले. दलाली वजा जाता ७६ लाख, १३ हजार ६२४ रुपये पाटील यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित असताना तसे झाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी निफाड पोलीस ठाणे गाठून तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.