तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या दाभाडी ग्रामपंचायतीत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात पालकमंत्री दादा भुसे तथा शिंदे गटाची जीत आणि याच गटाची हारदेखील झाल्याचे बघावयास मिळाले आहे. अत्यंत उत्कंठावर्धक बनलेल्या तेथील सरपंचपदाच्या सामन्यात भुसे गटाचे प्रमोद निकम यांनी बाजी मारली आहे. भुसे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे शशिकांत निकम यांचा त्यांनी दारुण पराभव केला आहे.

हेही वाचा >>> शिवसेना फुटीनंतर नाशिकमध्ये उणीधुणी काढण्याची स्पर्धाच लागली

भाजप गटाचे संजय निकम यांनाही तेथे पराभवाची नामुष्की सहन करावी लागली आहे. दाभाडीत सरपंचपदासाठी भुसे गटाचे तीन आणि भाजप व ठाकरे गटाचा प्रत्येकी एक असे एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या १७ जागांसाठी भुसे गटाचे दोन व भाजप गटाचे एक असे तीन पॅनल परस्परांविरुध्द उभे ठाकले होते. यामुळे या निवडणुकीविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रमोद निकम यांनी शशिकांत निकम यांचा साडे चौदाशे मतांनी पराभव केला. सदस्यांच्या निवडणुकीत मात्र शशिकांत निकम यांच्या पॅनलची सरशी झाली आहे. त्यांना ११ जागा मिळाल्या असून प्रमोद निकम यांच्या पॅनलला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपला केवळ एक जागा मिळवता आली.