नाशिक : कळवण तालुक्यातील सप्तशृंग गड येथे रविवारी दुपारी देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या चारचाकी वाहनाने फ्युनिक्युलर रोपवे ट्रॉली परिसरात अचानक पेट घेतला. कर्मचाऱ्यांनी त्वरीत आग विझवल्याने अनर्थ टळला. रविवार आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. रविवारी देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आपली वाहने रोपवे ट्रॉलीजवळ उभी केली होती.
हेही वाचा : साहित्य संमेलनाच्या निधीसाठी फिरण्याची गरज; आयोजकांचे समिती पदाधिकाऱ्यांना आवाहन
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दुपारी पावनेचारच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. ट्रॉली परिसरात भाविकांच्या सुरक्षेसाठी जोगोजागी अग्निप्रतिबंधक साहित्य उपलब्ध असल्यामुळे तसेच अग्निशमन दलाचे प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक असल्याने पुढील अनर्थ टळला. कर्मचाऱ्यांनी वाहनाला लागलेली आग नियंत्रणात आणली.