नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत २५ दिवसात नाशिक परिक्षेत्रात साडेसहा कोटींची रोकड, ५२ अग्निशस्त्रे, ८९ काडतुसे, पावणेसहा कोटींची अवैध दारु, ३४ कोटींचे दागिने आणि इतर वस्तू असा एकूण ४९ कोटी, सात लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

यासंदर्भातील माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली. गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात एकूण ७२ तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या नाक्यांवरील तपासणीत आतापर्यंत दोन कोटी १० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल, रोख रक्कम जप्त करण्यात आली. पाच जिल्ह्यांत २६४ भरारी पथके कार्यान्वित आहेत. आचारसंहिता सुरू झाल्यापासून आतापर्यंत परिक्षेत्रात सहा कोटी ५३ लाखाची रोख रक्कम, ५२ अग्निशस्त्रे, ८९ काडतुसे, १५३ इतक घातक शस्त्र, तसेच पाच कोटी ७५ लाख रुपये किंमतीची अवैध दारु, दोन कोटी ६७ लाख रुपयांचे अमली पदार्थ, ३४ कोटी रुपयांचे दागिने आणि इतर वस्तू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा : नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ

नाकाबंदी आणि गस्ती दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच कारवाईत २३ कोटी ७२ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि जळगाव जिल्ह्यात एक कोटी ४५ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलवारी, चाकू व कोयते जप्त करण्यात आले. धुळे जिल्ह्यात गांजाची शेती उद्ध्वस्त करण्यात आली. नाशिकमध्ये २० लाख ३४ हजार रुपयांचा गांजा वाहतूक करताना पकडण्यात आला. निवडणूक प्रक्रियेसाठी केंद्रीय पोलीस दलाच्या ८४ तुकड्या पाच जिल्ह्यात तैनात आहेत.

हेही वाचा : Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१२ गुन्हेगारांविरुध्द एमपीडीए

पाच जिल्ह्यांत १६ हजार ८९१ सराईत गुन्हेगार तसेच उपद्रवी व्यक्तींविरोधात विविध कलमांन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यात एमपीडीए अंतर्गत १२ सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्या्त आले. १२३ जणांना तडीपार करण्यात आले.