नाशिक – भुसावळ विभागातील मनमाड ते नांदगाव स्थानकादरम्यान तिसरा रेल्वे मार्ग आणि स्थानकातील इतर कामे दोन दिवस करण्यात येणार असल्याने काही गाड्या दोन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये ३० मे रोजी भुसावळ-इगतपुरी मेमू, इगतपुरी-भुसावळ पॅसेंजर, देवळाली-भुसावळ एक्स्प्रेस, भुसावळ-पुणे एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर या गाड्यांचा समावेश आहे. २९ मे रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये भुसावळ-देवळाली एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ, नागपूर-मुंबई यांचा समावेश आहे.

हेही वाचा – नाशिक : सिडकोत २५ पेक्षा अधिक वाहनांची गुंडांकडून तोडफोड; गुन्हेगारीचे पोलिसांना आव्हान

याशिवाय मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये ३० मे रोजी नांदेड-निजामुद्दीन एक्स्प्रेस अकोला-भुसावळ कॉर्ड लाईनमार्गे वळवली जाईल. नांदेड – अमृतसर सचखंड एक्स्प्रेस अकोला-भुसावळ कॉर्ड लाईन मार्गे निघेल. २९ मे रोजी अमृतसर- नांदेड सचखंड एक्स्प्रेस भुसावळ कॉर्ड लाईन, अकोलामार्गे जाईल. निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस जळगाव, उधना, वसई, रोहामार्गे जाईल. २८ मे रोजी एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस एर्नाकुलम येथून रोहा, वसई, उधना, जळगाव मार्गे निघेल. रेल्वे प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some trains including igatpuri bhusawal and pune express will not run for two days ssb
First published on: 28-05-2023 at 12:40 IST