नाशिक येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानात पुरातत्व विभागाच्या वतीने मूर्ती संवर्धनाच्या कामामुळे मंदिर सात दिवस बंद होते. शुक्रवारपासून भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे.

हेही वाचा- डॉ. सुधीर तांबेंमुळे काँग्रेसची कोंडी, नाशिकमध्ये भाजपची खेळी यशस्वी ?

बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात मूर्ती झीज, गर्भगृहातील दुरूस्तीचे काम पुरातत्व विभागाच्यावतीने हाती घेण्यात आले होते. या काळात पुरातत्व विभागाकडून शिवलिंगावर वज्रलेप करण्यात आला. तसेच गर्भगृहास चांदीचे दरवाजे बसविण्यात आले. त्याशिवाय मंदिराच्या सभामंडपात असलेला हर्षमहालही दर्शनासाठी दररोज उघडा ठेवण्यात येणार आहे. सभामंडपातील दर्शन रांगेसाठी बसविण्यात आलेले लोखंडी कठडे काढून स्टेनलेस स्टीलचे कठडे बसविण्यात आले आहेत. ही सर्व कामे देवस्थानचे अध्यक्ष विकास कुलकर्णी आणि विश्वस्त मंडळाचे नेतृत्व आणि पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहेत.

हेही वाचा- सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास विचार करु; चंद्रशेखर बावनकुळेंच्या भूमिकेने नाशिक पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंदिर शुक्रवारी सकाळी सातपासून भाविकांना दर्शनासाठी नियमितपणे खुले होणार आहे. भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे. हर्षमहाल सिसम आणि सागवानीवर केलेल्या अप्रतिम कलाकुसरीचा नमुना आहे. त्याचेही पुन:सौंदर्यीकरण आणि नुतनीकरण करण्यात आले आहे. तो वर्षातून तीन वेळेस भाविकांना पाहता येतो. आता तो दररोज भाविकांना पाहता येणार असून दर्शनासाठी खुला ठेवण्यात आला आहे.