नाशिक – शिवसेनेचे (उद्धव ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याबाबत कुठलीही नाराजी नाही. आजपर्यंत पक्षाने भरपूर काही दिले आहे. राजकारण म्हटले की काही गोष्टी चालू असतात, असे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. ज्या पत्रकार परिषदेत ही घोषणा झाली, त्यास खुद्द महानगरप्रमुख शिंदे हे उपस्थित होते.

शिंदे यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहिले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विलास शिंदे यांचे कौतुक केले होते. तसेच ठाकरे गटाचे उपनेते बडगुजर यांनी महानगरप्रमुख शिंदे यांच्यासह पक्षात १० ते १२ जण नाराज असल्याचे म्हटले होेते. या पार्श्वभूमीवर, शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सावध भूमिका घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघटनात्मक फेरबदल हा सर्वस्वी वरिष्ठांचा अधिकार असल्याचे नमूद केले. वरिष्ठ पातळीवर घेतलेल्या निर्णयावर आपण बोलणे उचित नाही. महिनाभरापूर्वी पक्षाचे शहरात शिबीर झाले. आम्ही तीन महिन्यांपासून सर्व एकत्रित काम करीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेकडे (ठाकरे गट) राखण्यात यश मिळाले. बडगुजर यांनी जिल्हाप्रमुख नियुक्तीत विश्वासात न घेतल्याच्या कृतीवर आपण बोलणे उचित नाही. तो विषय वेगळा आहे. मर्यादेत राहून काम करणारे आपण शिवसैनिक असल्याचा दावा शिंदे यांनी केला.