scorecardresearch

हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांसाठी मध्यरात्री एनएमएमटी बसच्या ३२ फे-या

अजून पाच दिवस मध्यरात्रीची लोकल वाहतूक बंद असल्याने हार्बरवर लोकलसेवेवर अवलंबून असणा-या प्रवाशांना या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

32 rounds NMMT buses midnight local passengers Harbor route panvel
हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांसाठी मध्यरात्री एनएमएमटी बसच्या ३२ फे-या (संग्रहित छायाचित्र)

पनवेल: मागील चार दिवसांपासून पनवेल रेल्वेस्थानकातून प्रवास करणा-यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवारी मालडबे घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावर येजा करणा-या हजारो प्रवासी अन्नपाण्याविना राहीले. तर मंगळवारी सकाळी रेल्वेचे वेळापत्रक सूधारणार असे वाटत असताना उशीराने येणा-या लोकलमुळे प्रवाशांनी रेल्वेरुळावरुन पायपीट करावी लागली. अजून पाच दिवस मध्यरात्रीची लोकल वाहतूक बंद असल्याने हार्बरवर लोकलसेवेवर अवलंबून असणा-या प्रवाशांना या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम सेवेने (एनएमएमटी) रात्रीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ८ विशेष बसगाड्यांव्दारे ३२ फे-या पनवेल ते बेलापूर या मार्गांवर सूरु केल्या आहेत. अवघ्या २० रुपयांत होणा-या या प्रवासासाठी तीन आसनी रिक्षाचालक तीनशे रुपये आकारतात. पनवेल रेल्वेस्थानकापासून बसथांबा दूर असल्याने अनेक प्रवासी बससेवेपासून अनभिज्ञ आहेत. यामुळे चढ्या दराने भाडे आकारणा-या रिक्षाचालकांची चंगळ होत आहे.

heavy vehicles,Night entry of heavy vehicles prohibited on Airoli Katai route , Airoli Katai route
ऐरोली काटई मार्गावर गर्डर; जड अवजड वाहनांना रात्री प्रवेश बंदी
auto passengers
ठाण्यातील कोंडीमुळे रिक्षा टंचाई; गावदेवी भागात प्रवाशांना अर्धा ते पाऊण तासानंतर उपलब्ध होतेय रिक्षा
indian railways irctc ticket refund rules how to get full refund to train ticket for cancelled or late running
ट्रेन लेट झाल्यास रेल्वे पूर्ण पैसे देते रिफंड, इथे- तिथे न जाता करा फक्त ‘हे’ काम; थेट बँकेत येतील पैसे
central railways collect fine rs 16 88 crore in one month from ticketless travellers
अमरावती: फुकट्या प्रवाशांमुळे मध्‍य रेल्‍वेला एका महिन्‍यात १६.८८ कोटींचे उत्पन्न

हेही वाचा… आता ​तृतीय पंथीयांसाठी विशेष शौचालय; कोपरी गावात उभारणी; राज्यातील चौथा तर शहरातील पहिला उपक्रम

मागील चार दिवसांपासून पनवेल स्थानकातून प्रवास करणा-या हजारो प्रवाशांचे हाल झाले आहेत. तसेच मालवाहतूकीसाठी समर्पित डेडिकेटेड फ्रेट कॉरीडॉरच्या कामासाठी पनवेल स्थानकात लोकल वाहतूक बंद असल्याने एक्सप्रेसमधून येणारे प्रवासी बेलापूरपर्यंत कसे पोहचणार यासाठी एनएमएमटीची बससेवा सूरु आहे. मात्र तीन आसनी रिक्षा स्थानकाचे प्रवेशव्दारावर उभ्या केल्या जात असल्याने प्रवाशांना स्थानकापासून शंभर मीटर अंतरावर एनएमएमटी सेवा सूरु आहे की नाही याबाबत माहितीच मिळू शकत नाही. एनएमएटी प्रशासनाने मागील अनेक दिवस रात्रीचा लोकल वाहतूक बंद असल्याने बससेवा सूरु केली मात्र या बससेवेला प्रतिसाद अत्यंत कमी आहे. अजून किती दिवस लोकल प्रवास वाहतूक बंद केली जाईल याबाबत माहिती अनिश्चित आहे.

हेही वाचा… लिंबाच्या दरात वाढ

नवीन फ्रेट कॉरीडॉरमुळे स्थानकातील फलाटांचे क्रमांक बदलण्यात आले आहे. सध्या याच फलाटांच्या नंबरमुळे प्रवाशांची चांगलाच गोंधळ उडत आहे. पनवेल रेल्वे स्थानकात चार फलाटांपैकी दोन फलाट कायमचे रद्द केले आहेत. तर बाहेरच्या बाजूला नविन फलाट सूरु केले आहेत. मंगळवारी सकाळी कोणतीही पुर्वसुचना न देता फलाट आणि त्यांचे नंबर बदलण्यात आले. यामुळे रोजच्या ठिकाणी लागणारी लोकल दुस-याच फलाटावर लागल्याने प्रवाशांची पळापळ झाली. सकाळपासून लोकल २५ मिनिटे उशीराने धावत असल्याने प्रवासी हैराण झाले होते. वेळा पत्रकात असूनही काही गाड्या एनवेळी रद्द केल्याने रेल्वे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा… उरणकरांची एप्रिल २०२४ पर्यंतची पाणी चिंता मिटली, मात्र पाणी कपात कायम रहाणार, कारण काय?

रिक्षाचालकांवर कार्यवाही करावी यासाठी पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाने रात्रपाळीत अधिकारी नेमण्याची मागणी होत आहे. मीटर प्रमाणे भाडे आकारत नाहीत. उद्धट वागणूक, गणवेश घालत नाहीत आणि रस्त्यावर बेशीस्त रिक्षा उभ्या केल्या जात अशा अनेक नियमबाह्य कृती होऊनही पनवेलच्या प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी गप्प आहेत. याबाबत उपप्रादेशिक अधिकारी अनिल पाटील यांना संपर्क साधला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 32 rounds of nmmt buses at midnight for local passengers on the harbor route in panvel dvr

First published on: 03-10-2023 at 18:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×