नवी मुंबई -नवी मुंबई शहरात आज शनिवारी सकाळपासूनच  पावसाचे धुमशान सुरु  झाले  आहे.मागील अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेला पाऊस दाखल झाला आहे. बेलापूरमध्ये पहिल्याच दिवशी बारा तासात १०३ मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.  संपूर्ण शहरात सरासरी ६३..५०मिलिमीटर पाऊस पडला आहे.शहरात सुरू झालेल्या पहिल्याच पावसात ८ झाडे कोसळली असून दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. तर शहरातील बेलापूर बस स्थानक तसेच आयुक्त बंगल्यासमोर पाणी साठल्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> वहाळचे उपसरपंच आणि सदस्याला बेदम मारहाण, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

 नवी मुंबई शहरात जून महिना कोरडाच गेल्यामुळे नवी मुंबईत पाणी कपात सुरू आहे. मोरबे धरणात फक्त २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने प्रशासनासह नवी मुंबईकरांना पाण्याची चिंता वाटू लागली  होती .आज सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.तसेच  नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उकाड्याच्या प्रचंड त्रासामुळे  नवी मुंबईकर आतुरतेने पावसाची वाट पाहत होते .शनिवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. बेलापूर ते दिघा परिसरात सर्वच उपनगरात पाऊस झाला असून बेलापूरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे .बारा तासात १००  मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याने नेरूळ व बेलापूर परिसरामध्ये काही ठिकाणी पाणी साठण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरात ८ झाडे कोसळली आहेत तर २ आगीच्याही घटना घडल्या आहेत.

पहिल्याच दिवशी पावसाचे घुमशान :  शनिवारी सकाळी ८.३० ते रात्री ८.३० पर्यंतचा पाऊस

बेलापूर-  १०३.६० मिमी.            

नेरुळ – ६३.६० मिमी                                  

वाशी- ७७.२० मिमी                                    

कोपरखैरणे- ५५.४० मिमी                              

 ऐरोली- ४७.६० मिमी   

दिघा – ३०.०० मिमी                              

सरासरी पाऊस-६३.५० मिमी.        

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झाडे कोसळली –  ८