पनवेल: तालुक्यातील वावंजे गावातील एका रेसॉर्टमध्ये दोन दिवसांपूर्वी वाढदिवसाच्या कार्यक्रमात ऑक्रेस्ट्रा ठेवून गौतमी पाटील हीच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवणे आयोजकांना महागात पडले आहे. यापूर्वी पोलीसांनी खुल्या मैदानात कामोठे येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमात गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमाला परवानगी दिली होती.  

अंकित वर्मा या तरुणाचा १२ ऑक्टोबर दिवशी वाढदिवसाचा कार्यक्रम वावंजे गावातील सहारा रेसॉर्टवर आयोजित केल्याने गौतमी पाटील या कार्यक्रमाला येणार होती. आयोजकांनी पोलीसांची परवानगी मागीतली होती. मात्र पोलीस उपायुक्तांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. तरीही गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम केल्यामुळे आयोजकांवर शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता गुन्हा नोंदविला. नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी तालुक्यामध्ये ८ ते २२ ऑक्टोबर या दरम्यान जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांना याच आदेशाचे उल्लंघन करुन पथकरावरील आंदोलनामुळे गुन्हा नोंद करण्यात आला.

हेही वाचा… नवरात्रोत्सवासाठी नारळाच्या शाहळ्यांचे मुखवटे; उरणच्या नागाव मध्ये साठ वर्षाची परंपरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन पनवेल पोलीसांनी याच आदेशाचा आधार घेऊन गौतमी पाटील यांचा विना परवानगी नृत्याच्या कार्यक्रम ठेवल्यामुळे आयोजक रमाकांत चौरमेकर, अंकित वर्मा, सहारा रिसॉर्टचे मालक आणि व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या जमाव बंदीच्या काळातच कामोठे येथे खुल्या मैदानात गौतमी पाटील हीच्या नृत्याचा आणि पनवेल शहरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागताच्या जाहीर कार्यक्रमाला पोलीसांनी परवानगी दिली होती.