पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईत येत असून विविध कामाचे लोकार्पण उद्धाटन आदी भरगच्च कार्यक्रम आहे. तसेच ते जनतेला संबोधित करणार असल्याने मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्त्यांचे आणि बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचाही ताफा यात आहे. बाहेर गावातून येणाऱ्या अतिरिक्त बसमूळे सकाळी काही प्रमाणात वाहतूक कोंडीही झाली होती.

हेही वाचा- VIDEO : नवी मुंबई परिवहन बसला खोणी-तळोजा रस्त्यावर आग, जिवीतहानी नाही

नवी मुंबईतूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना होण्याची लगबग सकाळपासून सुरू आहे. नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली अनुक्रमे मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक हे भाजपाचेच आमदार असल्याने भारत माता की जय आणि जय हिंदचा नारा देत शक्ती प्रदर्शन करीत दुपारी १२ वाजल्यापासून टप्प्या टप्प्याने कार्यकर्त्यांचे ताफे मुंबईच्या दिशेने जात आहेत. याबाबत नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरात यांनी माहिती देताना संगितले की ९९ मोठ्या बस २ मिनी बस आणि ४० छोट्या गाड्या जाणार असून त्यातील अनेक रवाना झालेल्या आहेत. तर बाळासाहेबांची शिवसेनेचे नवी मुंबई अध्यक्ष विजय चौगुले यांनी माहिती देताना सांगितले की मोदी हे देशाचे पंतप्रधान असून आमच्या पक्षाशी समविचारी आहेत . त्यामुळं आम्हीही सभेला जात आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.