scorecardresearch

प्रशासनाची अतिक्रमण विरोधी कारवाईकडे पाठ, नागरिक कृती समिती उतरणार रस्त्यावर

सेक्टर २६ मधील रहिवाशांनी येत्या २ एप्रिल रोजी प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा नागरिक कृती समिती मार्फत देण्यात आला आहे.

administration ignore Anti-encroachment
अतिक्रमण विरोधी कारवाईकडे पाठ फिरवल्याने या विरोधात रहिवासी करणार आंदोलन (फोटो सौजन्य- लोसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

नवी मुंबई: नवी मुंबईतील तुर्भे सेक्टर १९ एफ येथील भुखंड क्रमांक १ व ४ वरिल अनधिकृतझोपडपट्टी, व्यवसायिक गाळे, गॅरेज व वाहन पार्किंग बाबत तक्रार वारंवार करूनही कोणतीही कारवाई होत असून प्रशासनाने अतिक्रमण विरोधी कारवाईकडे पाठ फिरवल्याने या विरोधात आता सेक्टर २६ मधील रहिवाशांनी येत्या २ एप्रिल रोजी प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा नागरिक कृती समिती मार्फत देण्यात आला आहे.

वाशी,सेक्टर १९ एफ तुर्भे येथील भुखंड क्रमांक १ व ४ वर अतिक्रमण करून या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्टी, व्यवसायिक गाळे,गॅरेज व अनधिकृत अवजड वाहन पार्किंग करण्यात येते. या भूखंडाच्या हाकेच्या अंतरावर दोन इंटरनॅशनल शाळा व एक मराठी तसेच इंग्रजी माध्यम आहेत. तसेच या परिसरांत सिडको ने निर्माण केलेल्या वसाहतीत तसेच इमारतीत २५ हजारांपेक्षा जास्त नागरीक राहतात. अशा गजबजलेल्या परिसरात राजरोसपणे झोपडपट्टीतून अंमली पदार्थांची विक्री, बांग्लादेशी सारख्या परदेशी नागरीकांचे छुपे वास्तव्य, रात्रीच्या वेळी उघड्यावर देह व्यापार, अनधिकृत ट्रक टर्मीनल सुरू आहे. यामुळे नागरीक हवालदिल झाले आहेत.

आणखी वाचा- नवी मुंबई पोलिसांसाठी सायबर क्राईम ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन

या बाबत मागील दोन ते तीन वर्षांपासून सेक्टर २६ मधील अनेक लोकप्रतिनीधी, समाजसेवक, गृहसंकुल तसेच नागरिकांच्या वतीने वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र आतापर्यंत प्रशासनाकडून कोणतीही कडक कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध तुटला असून येथील नागरीकांनी नागरिक कृती समितीच्या माध्यमातून दिनांक २ एप्रिल २०२३ रविवार रोजी वाशी सेक्टर २६ येथील पुनीत कॅार्नर सोसायटी समोरील चौकात सिडको व नवी मुंबई माहानगरपालिका प्राधिकारणाविरोधात रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 16:10 IST

संबंधित बातम्या