नवी मुंबई : सोमवारी शहरात १२५ मिलिमीटर पाऊस होऊनही जनजीवन सुरळीत सुरू होते. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्याने मंगळवारी काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. शहरांतील भुयारी मार्ग तसेच महापे आद्योगिक वसाहतीतील पुलांखाली कंबरभर पाणी साचले होते. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवाही विलंबाने सुरू होती. तसेच शहरात सहा ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.

पनवेल व उरण तालुक्यातही पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र होते. तर विमानतळ बाधित डुंगी गावातही नेहमीप्रमाणे पाणी शिरले होते.

शहरातील रेल्वेमार्गाखालील असलेल्या सानपाडा, तुर्भे, नेरुळ या ठिकाणच्या भुयारी मार्गांत पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अनेक दुचाकी या पाण्यात अडकून पडल्या. पाऊस व वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या. काही ठिकाणी शॉर्टसर्किट होत आगीच्या घटनाही घडल्या. तर दिघा इलठणपाडा येथे दरड कोसळल्याची घटना घडली.

सायंकाळी ४ नंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती, परंतु संध्याकाळी ६ नंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला होता. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरातही चांगला पाऊस पडल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. त्यामुळे खालवलेल्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
मुंबईबरोबरच नवी मुंबई शहरातही जोरदार पावसामुळे रेल्वे विलंबाने धावत होती. परंतु कोणत्याही मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णतः बंद नव्हती. मानखुर्द तसेच कुर्ला रेल्वे परिसरात पाणी साचल्याने रेल्वे विलंबाने धावत होत्या.- अनिल जैन, साहाय्यक जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे
सहा ठिकाणे झाडे कोसळली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेलापूर एनआरआय पोलीस स्टेशनच्या मागे, वाशी सेक्टर २६ कोपरी गाव, नेरुळ सेक्टर २७, घणसोली गाव, नेरुळ सेक्टर १६ सागर दर्शन सोसायटी, एपीएमसी मार्केट वाशी सेक्टर १९ या ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.
शॉर्टसर्किट , वाशी सेक्टर १८ क्रिस्टल सिटी,मोराज सर्कल, प्रोग्रेसिव्ह,दरड कोसळली,दिघा इलठणपाडा येथे दरड कोसळली, दगड रस्त्यावर आले.