नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा सुव्यवस्था महाराष्ट्र ) मिलिंद भारंबे यांची नियुक्ती झाली आहे. जेष्ठ नागरिक आणि महिला सुरक्षेवर अधिक भर देणार असून संघटित गुन्हेगारी आणि सायबर गुन्हेगारीवर अंकुश ठेवणार असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांनी सांगितले. आज संध्याकाळी मावलते आयुक्त बीपीनकुमार सिंग कडून त्यांनी पदभार स्वीकारला.

हेही वाचा- पनवेल: पैसे उडविणा-या गिऱ्हाईकावरून बारबालांची आपसात मेकअपखोलीत धुमश्चक्री

आयुक्तांची बदली आणि नवीन आयुक्त कोण येणार या अनेक महिन्यापासून नवी मुंबई पोलीस दलात सुरू असलेल्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला. विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा सुव्यवस्था विभागाचे मिलिंद भांबरे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून वर्णी लागली. बुधवारी संध्याकाळी त्यांनी पदभार स्विकारला. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शहरातील नागरिकांना हे शहर सुरक्षित वाटावे या साठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा- नवी मुंबई : पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांची बदली, मिलिंद भारंबे नवे पोलीस आयुक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेष्ठ नागरिक आणि महिला सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे सांगत त्यांनी संघटित गुन्हेगारीवर आळा घालणार असल्याची माहिती दिली. सायबर गुन्हेगारीत होणारी वाढीबाबत त्यांनी चिंता व्यक्त करीत या बाबत ठोस उपाययोजना आणि जनजागृती वर भर देणार असल्याचे सांगितले. हे शहर त्या मानाने शांत असले तरी वाढती व्हाइट कॉलर गुन्हेगारी , घरफोडी वाहन चोरी हे आव्हान असल्याचे सांगत हे आव्हान मोडून काढणार झल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.