पनवेल – मूळ पाकिस्तानमध्ये राहणारे सपना आणि नोतनदास सचदेव हे भारतात सहा महिन्यांपूर्वी मुलांसोबत आले होते.  सपना हीला पुन्हा पाकिस्तानमध्ये जायचे होते आणि नोतनदास हा भारतात राहण्यास इच्छुक होता. याच वादातून अनेकदा नोतनदास व त्याची पत्नी सपना यांच्यात मागील अनेक महिन्यांपासून वाद सुरू होते. याच वादातून सोमवारी नोतनदास याने सपना हीच्या शरीरावर चाकूने अनेक वार करुन तीची निघ्रुण हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. 

सोमवारी खारघर पोलीसांचे पथक या प्रकरणी सपना हीच्या नातेवाईकांकडे कसून चौकशी करत होते. सपना हीच्या बहिणीने दिलेल्या माहितीनूसार हिंदू धर्मिय असणारे नोतनदास व सपना हे मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतात आले. नोतनदास याचा स्वभाव रागीट होता. तो त्याच्या भावाच्या ड्रायफ्रुटच्या व्यवसायात त्याला मदत करत होता. मात्र त्या व्यवसायातही त्याच्या हाती काही लागत नसल्याने तो मागील अनेक दिवसांपासून घरीच होता. सपना आणि नोतनदास यांना १० आणि सहा वर्षांची दोन मुले आहेत.

सोमवारी मुले शाळेत आणि शिकवणीला गेल्यावर नोतनदासने सपना हीला चाकूने खांद्यावर पाठीवर असे अनेक ठिकाणी वार करुन ठार केले. त्यानंतर स्वताचा गळा त्याच चाकूला चिरुन स्वता आत्महत्या केली. मुले सकाळी साडेदहा वाजता घरी आल्यावर त्यांनी घराचा दरवाजा उघडत नसल्याने शेजारच्यांकडे धाव घेतली. शेजारच्यांनी सपना हीच्या बहिणीला ही बाब सांगीतल्यावर सपना हीचे नातेवाईक व मित्र परिवारांपैकी एका व्यक्तीने  शेजारच्या सदनिकेच्या गॅलरीतून घरात प्रवेश करुन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सपना व नोतनदासला पाहीले. घराचा दरवाजा आतून उघडल्यानंतर खारघर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सपना हीच्या बहिणीने दिलेल्या माहितीनूसार लग्न झाल्यापासून सपना हीला नोतनदास मारहाण करत होता. भारतात आल्यानंतर सपना हीने अनेकदा पतीकडे परत पाकिस्तानमध्ये जाऊया असे म्हटले होते. मात्र नोतनदास याला भारतात राहायचे होते. यावरुन अनेकदा भांडणे सुरू होती असेही सपना हीच्या बहिणीने पोलिसांना सांगीतले. २५ मे रोजी सुद्धा भांडणानंतर मारहाण झाल्यावर सपना हीने नवी मुंबईच्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधला होता. ज्यावेळेस पोलीसांत हे प्रकरण गेल्यावर सपना हीने हा कुटूंबातील वाद असून पती नोतनदास याच्याविरोधात तक्रार देण्यास नकार दिला होता. अखेर सपना हीला नोतनदास याने संपवले.