उरण : न्यायालयाने पीओपी गणेशमूर्तीना परवानगी दिल्याने जगात गणपतीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण (हमरापूर) परिसरात गणेशमूर्तीकारामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. हा निर्णय उशिरा झाल्याने मूर्ती घडविण्याच्या मजुरीत ३० टक्केची वाढ झाली आहे. याचा फटका येथील गणेशमूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांना बसला आहे. मात्र उशिरा का होईना परवानगी मिळाल्याने मूर्तिकारांनी आनंद व्यक्त केला आहे.
यावर्षीच्या गणेशोत्सवाला अवघा महिना उरला असून गणेशमूर्तीकारांची लगबग सुरू आहे. गणपतीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण तालुक्यातील हमरापूर विभागातील दादर,कळवे, जोहे,तांबडशेत या गावातील गणपती कारखान्यातून मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत. या परिसरात एक हजारापेक्षा अधिक छोटे मोठे कारखाने आहेत. प्रत्येक घरात एक कारखाना आहे. येथील मूर्तिकार मजूर हे वर्षातील आठ महिने मूर्ती बनविण्याचे काम करतात तर दोन महिने हे कारखाने बंद असतात. कळवा येथील लोकमान्य कला केंद्र चे मालक वसंत पाटील यांच्या कारखान्यात दहा वर्षांपासून मूर्ती बनविल्या जात आहेत. यात किमान ५ फूट उंच मुर्त्या तयार करतात. या गणेश मूर्त्याना राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, कोकणासह कल्याण, ठाणे , मुंबईतुनही मागणी आहे.
या करखान्यात वर्षाला १००० ते १२०० मुर्त्या बनवतात. कच्चा मुर्त्या फक्त. ५ फूट मूर्तीवर १००/ २०० रुपये वाढले, मजुरी ५०० ची ७०० झाली. असून दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. २५ टक्के विक्रीची किंमत वाढली आहे. मुंबईतील पवई येथील कारखान्यात येथील कच्च्या मुर्त्या कळवे येथील नेल्या जात आहेत. या कारखान्यात ३५०/४०० मुर्त्या ११ फूट मूर्ती पवई मधील कारखाना हा ५० वर्षे सुरू असल्याची माहिती मंगेश रावले यांनी दिली. रावळे गणपती चित्रशाळा असे त्यांच्या कारखान्याचे नाव आहे. तर साहिल कला केंद्र, जोहे, येथे संतोष रसाळ यांचा १७ वर्षांपासून कारखाना आहे. येथे १० फूट उंची पर्यंतच्या मूर्तीसाठी २५००० ते ४५ हजार रुपये आकारले जात आहेत. यात कच्चा आणि रंगविलेली मूर्ती असा प्रकार असतो. येथील गणेशमूर्ती या मुंबई, कर्नाटक, सुरत आदी ठिकाणी पाठविण्यात येतात. या कारखान्यातील मूर्ती उधारीवर खरेदी केल्या जातात मात्र दरवर्षी यातील ३० टक्के पैसे मिळत नाहीत. गेल्या वर्षी ८ लाख उधारी शिल्लक असल्याची माहिती रसाळ यांनी दिली. तर कारखान्यात ६ हजार छोट्या, ४ ते १० फूट ३००/४०० मोठ्या मोठ्या मूर्तीमध्ये ३०/३५ टक्के वाढ झाली आहे. २५०० चे ३५०० हजार झाले आहेत. या कारखान्यात एकूण २६ कामगार काम करीत आहेत.
शासनाने शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्याची व पर्यावरण राखण्याची घोषणा केली होती. मात्र शेकडो वर्षे शाडूच्या मूर्ती बनविणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान न देता सरकार अपेक्षा करीत तर दुसरीकडे शाडूच्या मातीच्या किंमतीतही १५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक मुर्ती बनविणाऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. पर्यावरण राखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून लाखो रुपये खर्च करीत आहे. मात्र मूर्तिकार अनुदाना पासून वंचीत आहेत. शंभर वर्षांपासून सुंदर, सुबक व देखण्या शाडूच्या गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या उरणच्या चिरनेर, कुंभारपाडा, जासईसह अनेक गावातील गणेशमूर्तींची कामे वेगाने सुरू आहेत. अनेक मूर्तिकार रात्रंदिवस या कामात व्यस्त आहेत. येथील गणेशमूर्ती या उरण, पनवेल, नवीमुंबई, मुंबई येथे पाठविल्या जात आहेत. छायाचित्राप्रमाणे शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करणारा कारखाना अशी ओळख असलेल्या या कारखान्यात केवळ शाडू मातीच्याच मूर्ती बनविल्या जात असत.
आता काळाच्या ओघात कामे वेळेत उरकत नसल्याने आणि बाहेरील व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मूर्तींची आवक होऊ लागल्याने, शाडू मातीपासून बनविल्या जाणाऱ्या मूर्ती या कमी होऊ लागल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती स्वस्त आणि पाण्यात विरघळत नसताना देखील परवडतात. म्हणून त्यांना अधिक मागणी आहे. मात्र महागाई असली तरी चिरनेर मधील ओमकार कला केंद्रामध्ये गणेश भक्तांची मे. महिन्यापासून ये जा सुरू होते. त्याचे कारण म्हणजे फोटो प्रमाणे गणेश मूर्ती बनवून दिल्या जात असल्याने, या कारखान्यात गणेश भक्त ऑर्डर साठी येत असतात. अशी माहिती ओमकार कला केंद्राचे भाई चौलकर, संदेश चौलकर यांनी दिली.
दरम्यान महागाई वाढली असली तरी गणेश भक्तांकडून शाडूच्या पर्यावरण पूरक शाडू माती पासून बनविलेल्या गणेश मूर्तींना विशेष मागणी आहे. चिरनेर येथे घडविल्या जाणाऱ्या गणेश मूर्तीच्या कारखान्याला शंभर वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा आहे. चिरनेर कुंभारपाडा हा खास गणपती बाप्पाच्या मूर्ती व मातीची भांडी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान या कुंभार पाड्यात शाडूच्या मातीचे म्हणजे पर्यावरण पूरक माती पासून बनविल्या जाणाऱ्या गणेश मूर्तींचे निवडक कारखाने आहेत. आज या सर्वांची तिसरी, चौथी, पाचवी पिढी शाडू मातीपासून मूर्ती घडवित आहेत.
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या शाडूच्या मातीच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर मजुरांची मजुरी ही दोन हजारांनी वाढली आहे. त्यामुळे गणेशमूर्तीच्या किंमती वाढल्या आहेत. मूर्तिकारांच्या संघटनेने मागणी करूनही शासनाने अनुदान दिले नसल्याची माहिती जासई येथील मूर्तिकार मनोहर पवार यांनी दिली आहे.
चिरनेरमधील गणेशमूर्ती बनविण्याचा उद्योग शंभर वर्षाहून अधिक जुना आहे. येथील सुबक, देखण्या, रेखीव, आकर्षक मूर्ती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. या व्यवसायात ५० हून अधिक लहान मोठे घरगुती कारखाने कार्यरत आहेत. इथे कुंभार समाजाची वस्ती आहे. आणि या समाजातील कलाकार या व्यवसायावर अवलंबून आहेत. आणि ते त्यांचे एकमेव उत्पन्नाचे साधन असल्याचे मत चिरनेर मधील मूर्तिकार भाई चौलकर यांनी दिली आहे.