पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ३० सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने कंबर कसली आहे. युद्धपातळीवर विमानतळ प्रकल्पात काम सुरू आहे. मात्र सध्या या विमानतळ प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी संपादित झाल्यात अशा प्रकल्पग्रस्तांचा एक गट मात्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. रविवारी सकाळी ९ वाजता प्रकल्पग्रस्तांच्या या गटाने पळस्पे ते जेएनपीटी या मार्गावरील नांदगाव टेकडीवर चढाई करून सरकारला हाक मारण्याचे अनोखे आंदोलन आखले आहे. प्रकल्पग्रस्त तरुणांनी वेगळा गट करून आदोलनाची भूमिका घेतल्यामुळे यापूर्वीच्या प्रकल्पग्रस्त समितीमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे.
हे आंदोलन विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे, तसेच विमानतळात ज्यांच्या जमिनी संपादित झाली आहे त्या कुटूंबियांना विमानतळामध्ये रोजगार मिळावा आणि पुनर्वसन पॅकेज देताना केलेल्या आश्वासनांची पूर्तता करा या तीन मुख्य मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त तरुण एकवटणार आहेत. काही तरुणांनी घेतलेल्या आंदोलनाच्या आक्रमक आणि वेगळ्या भूमिकेची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून देखील अद्याप नामकरणाबाबत केंद्र सरकारने कोणताही निर्णय जाहीर केला नाही. भाजपचे विविध लोकप्रतिनिधींनी राज्य व केंद्रातील मंत्र्यांकडे पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधींना सबूरीचा सल्ला दिला जात आहे. परंतू या दरम्यान राज्याचे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल असे आश्वासित केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्यावतीने वेळोवेळी आंदोलन करणा-या २७ गाव प्रकल्पग्रस्त समितीने या आश्वासनावर विश्वास ठेऊन आंदोलनाचा थेट पवित्रा आतापर्यंत घेतला नव्हता. मात्र याच समितीमधील अनेक सदस्यांनी राजीनामा देऊन वेगळी चूल मांडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी विमानतळ प्रकल्पासाठी संपादित झाल्या आहेत अशाच कुटूंबातील सदस्यांना पहिल्यांदा रोजगारात प्राधान्य मिळावे ही मागणी सुद्धा घेऊन हे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनातील तीसरी महत्वाची मागणी ही प्रकल्पग्रस्तांना सिडकोने दिलेल्या पूनर्वसन पॅकेजमध्ये ज्या बांधकामधारकांची घरे या प्रकल्पात संपादीत झाली आह