scorecardresearch

नवी मुंबईतही रविवारपासून रिक्षा प्रवास महागणार

१ ऑक्टोबरपासून मीटरमध्ये बदल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार आहे.

नवी मुंबईतही रविवारपासून रिक्षा प्रवास महागणार
नवी मुंबईतही रविवारपासून रिक्षा प्रवास महागणार

येत्या १ ऑक्टोबरपासून एमएमआरडीए क्षेत्रात रिक्षा प्रवासी भाडेवाढ होणार आहे. त्याच अनुषंगाने नवी मुंबई शहरात देखील दि. १ ऑक्टोबर, रविवार पासून प्रवासी रिक्षा भाडे वाढ होणार आहे. परिवहन कार्यालयाकडून नवीन दर लागू करण्यात आले असून त्यानुसार पहिल्या टप्याच्या प्रवासासाठी २१ ऐवजी आत्ता २३ रुपये मोजावे लागणार आहेत.

हेही वाचा- लवकरच नवी मुंबईकरांना मिळणार डबल डेकरची सफर ! एनएमटीच्या ताफ्यात १० विद्युत डबल डेकर बस दाखल

१ ऑक्टोबर पासून मीटरमध्ये बदल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार आहे. नवी मुंबईत १६ हजारांहून अधिक रिक्षा आहेत. इथे मीटर आणि सीट प्रमाणे रिक्षा चालवल्या जातात. ज्या प्रमाणे सीट वर प्रवाशी वाहतूक केली जाते त्याच प्रमाणे मीटरने रिक्षा प्रवास करणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे आता मीटरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता २१ ऐवजी २३ रुपये द्यावे लागणार आहेत. यासाठी मीटरचे रिडींग बदलण्याचे काम ही १ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहे ,अशी माहिती परिवहन विभाग अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या