राज्य सरकार सोमवारी नागपूर अधिवेशनात कामगार कायद्यात भांडवलदार व मालक धार्जिणे बदल करणारे विद्येयक मांडणार आहे. या सरकारच्या कामगार विरोधी धोरणांना सीआयटीयु ही केंद्रीय कामगार संघटना राज्य भर विरोध करणार असल्याची घोषणा सिटूचे महाराष्ट्र सचिव ऍड.एम.एच.शेख यांनी केली. उरणच्या जेएनपीटी कामगार वसाहतीच्या सभागृहात सीआयटीयुच्या रायगड जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते.

हेही वाचा- उरण नगर परिषदेच्या विमला तलावातील सीसीटीव्ही गायब; १६ पैकी ८ कॅमेरे चोरीला

नागपूर येथे विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकार ही कामगार कायद्यात बदल करणार आहे. या बदलात कामगाराना संरक्षण देणाऱ्या तरतुदी हटवून त्या ऐवजी भांडवलदार व मालकांच्या फायद्याचे बदल प्रस्तावित आहेत. या बदलात कामगार कायद्यात मालक आणि भांडवलदारासाठी असलेली शिक्षा आणि दंड यामध्ये कमी करून दिखाऊ तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे कामगार कायदे कमजोर होणार आहेत. याचा परिणाम कामगारांचे भांडवलदार व मालकांच्या शोषणात होणार आहे. त्यामुळे या कायदा बदलांचा संपूर्ण राज्यात सीआयटीयुच्या वतीने विरोध करण्यात येणार आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : नवीन वर्षात आरटीओचे कामकाज नवीन कार्यालयातून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीआयटीयुच्या रायगड जिल्हा अधिवेशनाची सुरुवात झेंडा वंदन आणि हुतात्म्यांना अभिवादन करून झाली. यावेळी सीआयटीयु चे रायगड जिल्हा सरचिटणीस व जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील यांनी तीन वर्षांच्या कामाचा अहवाल मांडला, तर कामगार प्रतिनिधीनी चर्चा करून पुढील काळात कामगारांच्या प्रश्नांवर लढा व एकजूट करण्याचा निर्धार करण्यात आला. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी मधुसूदन म्हात्रे हे होते तर यावेळी कॉम्रेड महाराष्ट्राचे कामगार नेते डॉ.एस.के.रेगे,कॉम्रेड के.आर.रघु यांच्यासह किसान सभेचे संजय ठाकूर,जनवादी महिला संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष अमिता ठाकूर,डीवायएफआय चे सचिव राकेश म्हात्रे,यांनी शुभेच्छा दिल्या. तर शशी यादव,कल्पना घरत,विद्या पाटील, हिरामण पाटील या कामगार प्रतिनिधींनी सूचना मांडल्या.