सोमवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे उरण करंजा सातघर येथील रहीवाशी केशव नागु गावंड यांचे घराचे भिंत( वाल कंपाऊंड) महेंद्र टिळक पाटील यांचे घरावर सोमवारी रात्री 3 चे सुमारास पडल्याने महेंद्र पाटील यांची पत्नी व मुलगा यांना किरकोळ जखमी झाले आहेत. त्याच्यावरपचार करण्यासाठ नेरुळ येथील डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहउरण मध्ये सोमवारी रात्री आठ वाजल्यापासूनच संततधार पावसाळा सुरुवात झाली होती.

हेही वाचा : नवी मुंबई : ऐन पावसाळ्यात विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ती मंगळवार पर्यंत सुरू होती त्यामुळे उरण शहरातील तसेच जेएनपीटी बंदर परिसरातील रस्त्यात पाणी साचले होते. उरण तालुक्यात एकूण 62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मंगळवार पासून साखर चौथीच्या गणेशोत्सवाला ही सुरुवात झाली असल्याने पावसामुळे नागरिकांना सणाच्या तयारीत अडथळा निर्माण झाला होता. उरण मध्ये पावसाचा जोर असला तरी मोरा ते मुंबई व जेएनपीटी मार्गावरील जलवाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती बंदर विभागाने दिली आहे.