News Flash

कुतूहल – मानवनिर्मित तंतूंच्या चार पिढय़ा

वस्त्रोद्योगामध्ये आज अनेक प्रकारचे तंतू वापरले जातात, नसíगक तंतू आणि मानवनिर्मित तंतू. या तंतूंचा शोध वेगवेगळ्या वेळी लागल्यामुळे त्यांचे

| February 24, 2015 01:25 am

वस्त्रोद्योगामध्ये आज अनेक प्रकारचे तंतू वापरले जातात, नसíगक तंतू आणि मानवनिर्मित तंतू. या तंतूंचा शोध वेगवेगळ्या वेळी लागल्यामुळे त्यांचे वर्गीकरण पहिल्या पिढीतील तंतू ते चौथ्या पिढीतील तंतू अशा चार पिढय़ांच्या वर्गातसुद्धा केले जाते.
नसíगक व नसíगक बहुवारीक तंतू (कापूस, लोकर, रेशीम, व्हिस्कोज इ.) हे पहिल्या पिढीतील तंतू (इ.स.पूर्वी ४००० ते १९४०). दुसऱ्या पिढीतील तंतू (१९४० ते १९८०) – संश्लेषित तंतू (नायलॉन, पॉलिस्टर, अ‍ॅक्रिलिक इ.). तिसऱ्या पिढीतील तंतू (१९८५ ते १९९०)-(अरामिड, पॉलिएथिलिन, अ‍ॅरोमटिक) आणि कार्बन, सिरॅमिक इत्यादी हे चौथ्या पिढीतील तंतू (१९९० च्या नंतर).
वस्त्रोद्योगात उपयोगात आणल्या जाणाऱ्या तंतूंना फार प्राचीन इतिहास आहे. सुमारे ४००० वर्षांपूर्वीपासून लोकर, रेशीम, कापूस यांसारखे नसíगक तंतू वस्त्रे बनविण्यासाठी वापरले जात आहेत. कापूस, ताग यांसारखे तंतू तर झाडांपासूनच मिळतात, तर लोकर आणि रेशीम हे तंतू प्राण्यांपासून मिळतात. नसíगक तंतूंचे उत्पादन त्यांच्या लागवडीसाठी उपलब्ध असणाऱ्या जमिनीच्या क्षेत्रावर अवलंबून असते. जगाची लोकसंख्या जसजशी वाढू लागली, तसे अन्नधान्याची मागणीही वाढू लागली. या अन्नधान्याच्या वाढीव उत्पादनासाठी अधिक जमीन उपलब्ध करून देणे गरजेचे होऊ लागले. अन्न हे मानवाची पहिली मूलभूत गरज असल्याने त्याच्या लागवडीसाठी जमीन उपलब्ध करून देण्यास साहजिकच प्रथम प्राथमिकता असते. त्यामुळे नसíगक तंतूंच्या उत्पादनासाठी जमीन कमी पडेल अशी शंका माणसांना येऊ लागली आणि म्हणूनच नसíगक तंतूंना पर्यायी असे कृत्रिम तंतू विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञ संशोधन करू लागले.
कृत्रिम तंतू तयार करण्याचा पहिला प्रयत्न इंग्लंडमध्ये इ.स. १६६४ मध्ये झाला. इंग्रजी शास्त्रज्ञ रॉबर्ट हूक याने रेशमाच्या जवळपास जाणारा असा तंतू तयार करण्याची शक्यता वर्तविली होती, परंतु खऱ्या अर्थाने कृत्रिम तंतू तयार करण्याची पद्धत विकसित होण्यासाठी पुढील २०० वष्रे वाट पाहावी लागली.
 चं. द. काणे (इचलकरंजी)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – पन्नाची मस्तानी
अलाहाबादच्या नवाबाने पन्नावर आक्रमण केले तेव्हा वृद्ध छत्रसालने पेशवा बाजीरावला मदतीस बोलाविले. त्यावेळी बाजीराव जवळ माळव्यातच तळ देऊन मुक्कामी असल्यामुळे त्याने सन्याला त्वरित नवाबावर पाठवून त्याचा बीमोड केला. त्याच्या या मदतीने भारावून जाऊन छत्रसालाने पुढे पन्ना राज्यक्षेत्राचा एक तृतीयांश प्रदेश, स्वतची कन्या मस्तानी, तेहतीस लक्ष सुवर्णमुद्रा आणि पन्नामधील एक हिऱ्यांची खाण बाजीरावास देऊन उपकृत केले. मस्तानीचा बाजीरावाशी रीतसर विवाह झाला. छत्रसालची पर्शियन मुस्लीम पत्नी रुहानीबाईपासून झालेली मस्तानी नृत्यातही प्रवीण होती. तिची आई रुहानीबाई पूर्वी हैदराबादच्या निजामाकडे दरबारी नíतका होती. मस्तानीच्या पूर्वायुष्याबाबत इतिहासकारांत एकमत नाही. काही इतिहासकारांच्या मताप्रमाणे मस्तानी छत्रसालची कन्या नसून पन्ना दरबारची नíतका होती. बाजीराव तिच्या प्रेमात पडला. मग छत्रसालनेच बाजीराव-मस्तानीचा विवाह लावून दिला. छत्रसालच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र हरदेशाह याने पन्नाचा कारभार सांभाळला. पुढे १८५७ च्या बंडात ब्रिटिशांना मदत केल्यामुळे त्यांनी पन्ना राज्यकर्त्यांला ‘महाराजा’ ही उपाधी दिली आणि राज्याला १७ तोफ सलामींचा बहुमान दिला. १९१८ साली महाराजा महेंद्र यादवेंद्रसिंग याने ब्रिटिशांशी संरक्षण करार करून त्यांची तनाती फौज राखली. ६७०० चौ.कि.मी. क्षेत्रफळाच्या विशाल पन्ना राज्यात १०१० खेडय़ांचा अंतर्भाव होता.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 1:25 am

Web Title: four generation of man made thread
टॅग : Navneet
Next Stories
1 कापूस पिकविणारी राज्ये
2 बहुआयामी पॉलिएस्टर
3 क्रांतिकारक नायलॉन