डहाणू : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या तलासरी तालुक्यातील गिरगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेतील एका नववी इयत्तेतील विद्यार्थिनीने शुक्रवार २७ जून रोजी शाळेच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गिरगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेत नववी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या पल्लवी खोटरे या विद्यार्थिनीने शाळेत प्रवेश घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी वसतिगृहातील पहिल्या मजल्यावर लोखंडी सळईला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार डहाणू तालुक्यातील विद्यार्थिनीने गिरगाव आश्रमशाळेत प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आत्महत्या केली आहे. विद्यार्थिनीला आश्रमशाळेत शिक्षण घेण्याची इच्छा नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून याविषयी तलासरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याविषयी तलासरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी आम्ही शाळेतील विद्यार्थिनिंना विचारपूस केली. प्राथमिक अंदाजानुसार विद्यार्थिनीला आश्रमशाळेत प्रवेश घ्यायचा नव्हता असे कळले आहे. याविषयी तलासरी पोलीस अधिक तपास करत आहेत. – विशाल खत्री, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डहाणू