नगर : गेल्या विधानसभा निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने नगर जिल्ह्यात १२ पैकी सर्वाधिक ६ जागांवर यश मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून नगर जिल्ह्याने शरद पवार यांना चांगली साथ दिलेली आहे. आता फूटीनंतर नगर जिल्ह्यावर पुन्हा एकदा आपल्याच शिक्कामोर्तबासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दोन्ही नेत्यांना नगर जिल्ह्याची राजकीय नस, सहकाराच्या जाळ्याची, त्यातून पुढे आलेल्या नेतृत्वाची, कार्यकर्त्यांची पुरेशी जाण आहे. त्यातूनच आपल्याच राष्ट्रवादीच्या संधीसाठी दोन्ही नेत्यांनी लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट होते आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने राज्यात चांगले यश मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष. रौप्य महोत्सवी वर्षात मिळालेले यश साजरे करण्यासाठी शरद पवार यांनी नगर जिल्ह्याची निवड केली. नगरची निवड का केली याचे स्पष्टीकरण देताना शरद पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे उदाहरण दिले. अहिल्यादेवींचे जन्मगाव चौंडी, नगर जिल्ह्यातील. राज्यात धनगर समाजाची मते प्रभावी ठरणारे जे जिल्हे आहेत, त्यात नगरचा समावेश होतो. होळकरांच्या राज्यावर चाल करून आलेल्या पेशव्यांना अहिल्यादेवींनी कसे धाडसाने तोंड दिले, याचे उदाहरण देत पवार यांनी नगरच्या निवडीचे कारण उघड केले. याचवेळी त्यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचेही आवाहन केले.

NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
wardha, Sharad Pawar, amar kale,
शरद पवारांची ‘ती’ ऑफर ‘या’ खासदाराने नाकारली, नेमकं काय घडलं? जाणून घ्या
sharad pawar marathi news (1)
अजित पवारांच्या ‘मी नवखा नाही’ विधानावर शरद पवारांचं खोचक भाष्य; म्हणाले, “खिशात ७० रुपये असताना…”!
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
rahul gandhi white t shitr campaign
राहुल गांधींची नवीन ‘व्हाईट टी-शर्ट’ मोहीम काय आहे? या मोहिमेचा उद्देश काय?
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
After defeat of Ajit Pawars NCP in Pimpri-Chinchwad former corporators office bearers are uneasy
अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला बालेकिल्ल्यात खिंडार?

हेही वाचा… तब्बल २४ वर्षं मुख्यमंत्रिपद भूषवलेले नवीन पटनाईक कशी बजावणार विरोधी पक्षनेत्याची भूमिका?

त्यानंतर आठवड्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवातही नगरमधूनच केली. एकत्रित राष्ट्रवादीला मिळालेल्या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत, सभा, आढावा घेत प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी चाचपणी केली. महायुतीतील जागावाटपात त्या राष्ट्रवादीकडेच राहतील याकडे लक्ष ठेवू असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या पाठोपाठ आपला दौरा होत आहे, हा योगायोग असला तरी नगरला महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या महत्त्व आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नगरमध्ये आहे, असे सांगत त्यांनी नगरवरील लक्ष अधोरेखित केले.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटाकडे चार तर शरद पवार गटाकडे दोन आमदार होते. नंतर शरद पवार यांनी आमदार नीलेश लंके यांना आपल्याकडे खेचून घेण्यात यश आले आणि लंके यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सहापैकी तीन विधानसभा क्षेत्रात भरघोस मताधिक्य मिळवत विद्यमान खासदार तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांचा पराभव केला. विखे यांचा पराभव ही शरद पवार यांच्यासाठी एकप्रकारची उद्दिष्टपूर्तीच ठरली आणि त्यातून त्यांचे जिल्ह्यावरील वर्चस्व सिद्ध झाले.

हेही वाचा… विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणीत वाढ; माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनेचाच भाजपात प्रवेश

गेल्यावेळी मिळालेल्या सहा जागा हा मुद्दा शरद पवार यांच्यासाठी महाविकास आघाडीत आणि अजित पवार यांच्यासाठी महायुतीत जागावाटपाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. दोघेही या जागांवर दावा करणार हे उघड आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचा जिल्ह्यात एकही आमदार नाही, आणि काँग्रेसचे केवळ दोन आमदार. ही शरद पवार यांच्यादृष्टीने नगरमधील जमेची बाजू. तशीच परिस्थिती महायुतीमध्ये. जिल्ह्यात शिवसेनेचा (शिंदे गट) एकही आमदार नाही आणि भाजपचे तीन आमदार, ही अजित पवार यांच्यासाठी जमेची बाजू. म्हणूनच दोन्ही राष्ट्रवादीने नगर जिल्ह्यावर विधानसभेसाठी लक्ष केंद्रित केलेले दिसते.