नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर एक-दोन जागांवर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने युती करू शकतो, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

फडणवीस गुरुवारी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, मनसेला आम्ही तीन, चार जागांवर मदत करू शकतो. उदाहरणार्थ शिवडीच्या जागेवर मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याची भूमिका घेतली आहे. अशाच काही जागांवर मुख्यमंत्र्याच्या संमतीने युती करता येऊ शकते. राज ठाकरे चांगले मित्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. परंतु या निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका वेगळी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : ‘मविआ’ला साथ देण्याचा रिपब्लिकन गटांचा निर्धार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जरांगे पाटील नेहमीच माझे नाव घेतात’

मनोज जरांगे पाटील दिवसातून तीन वेळा माझे नाव घेतात. ज्यांनी खऱ्या अर्थाने १९८२ पासून मराठा आरक्षण अडवून ठेवले त्यांच्याबद्दल ते काही बोलत नाहीत. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही, असेही फडणवीस म्हणाले.