मुंबई महानगरपालिका जिंकण्याचा निर्धार केलेल्या भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावरच मुंबईत भर दिला आहे. महिनाभराच्या अंतरात लागोपाठ दोनदा मोदी मुंबईत येत असून, विविध लोकोपयोगी कामांच्या माध्यमातून मुंबईकरांची मते जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

मुंबईतील मेट्रोचे लोकार्पण तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते १९ तारखेला झाला. तेव्हा मोदी यांनी समर्पित भावनेने काम करणाऱ्या लोकांच्या हातात मुंबईची सत्ता सोपविण्याचे आवाहन केले होते. केंद्र, राज्याप्रमाणेच मुंबईची सत्ता भाजपच्या हाती सोपवा, असे आवाहनच मोदी यांनी एक प्रकारे केले होते. आता १० फेब्रुवारीला मोदी यांचा पुन्हा मुंबई दौरा होणार आहे. यात धार्मिक कार्यक्रमाबरोबरच काही विकास कामांची उद्घाटने मोदी यांच्या हस्ते करण्याची योजना आहे. या दृष्टीने भाजपचे नेते नियोजन करीत आहेत.

हेही वाचा… कसब्यात उमेदवारीवरून भाजपमध्येच चुरस

हेही वाचा… ‘शिक्षक’च्या निवडणुकीत संस्थाचालकांची चांदी

महानगरपालिका निवडणुकीत पंतप्रधानांनी प्रचार करणे संयुक्तिक नसते. पण महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मोदी यांच्या मुंबई भेटीतून वातावरण निर्मिती करण्यावर भाजपने भर दिला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक सहजासहजी जिंकणे सोपे नाही याचा अंदाज बहुधा भाजपच्या धुरिणांना आला असावा. यातूनच मोदी यांच्या करिष्म्यावरच यश मिळविण्याचे भाजपचे प्रयत्न असावेत.

हेही वाचा… पदवीधर आणि शिक्षकमध्ये कोण बाजी मारणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी यांच्या मुंबई भेटी वाढल्याने महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल वा मे महिन्यात होईल, असा अंदाज शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.