पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १३३ रुग्ण आढळल्याने १ लाख ६१ हजार ८४४ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४ हजार २५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १५४ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ५१ हजार ८८९ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १२१ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ११९ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८७ हजार ९९६ वर पोहचली असून पैकी, ८४ हजार ७१० जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ८४९ येवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.